Tuesday, June 4, 2024

वनामकृवि अंतर्गत रस्त्याच्या कामाची नवी दिल्लीतील सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञाद्वारे तपासणी



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील २६ किलोमीटर लांबीचे अंतर्गत रस्ते मजबुतीकरण आणि डांबरीकरणाचे काम विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या पुढाकाराने प्रगतीपथावर आहे. दिनांक 3 मे रोजी या रस्त्याच्या कामाची गुणवत्ता तपासणी करण्याच्या अनुषंगाने नवी दिल्ली येथील सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ तथा स्थापत्य अभियंता डॉ. आशिष वालिया यांनी भेट दिली. डॉ. वालिया यांनी विद्यापीठात सुरु असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले व रस्त्याची गुणवत्ता अधिक सुधारण्याच्या दृष्टीने काही महत्वपूर्ण सूचना केल्या. यामध्ये मुख्यतः रोडच्या दोन्ही बाजूस मुरूम साईड पट्ट्या तयार करणे, रोडच्या दोन्ही बाजूस पाणी वाहून जाण्याच्या दृष्टीने चर खोदणे, केम्बर व्यवस्थित काढणे, रोड कामाचे गुणवत्तेच्या दृष्टीने डांबराचे तापमान तपासणे, कामाच्या थराची जाडी तपासणे या सूचना केल्या, व एकंदरीत काम समाधानकारक चालू असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, विद्यापीठ अभियंता श्री दीपक कशाळकर, उप विद्यापीठ अभियंता डॉ. दयानंद टेकाळे व विद्यापीठ अभियंता कार्यातील इतर सर्व अभियंते उपस्थित होते तसेच विद्यापीठ पातळीवर गठीत केलेल्या गुणनियंत्रण चमूचे सदस्य आणि सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, डॉ. विश्वनाथ खंदारे, विभाग प्रमुख डॉ. राजेश कदम, डॉ गजेंद्र लोंढे, सहाय्यक प्राध्यापक डॉ. एस. डी. विखे आणि शाखा अभियंता श्री. शेख अहमद आदींची उपस्थिती होती.