Monday, June 10, 2024

वनामकृविच्या छत्रपती संभाजीनगर आणि बदनापूर येथील कार्यालय प्रमुखांची बैठक संपन्न

 खरीप हंगाम, संशोधन प्रकल्पाबाबत मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी केले मार्गदर्शन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत छत्रपती संभाजीनगर येथे असलेले राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प, फळ संशोधन केंद्र, कृषि विज्ञान केंद्र, विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्र आणि कृषि तंत्र विद्यालय तसेच बदनापूर येथे असलेले कृषि महाविद्यालय, कृषि संशोधन केंद्र आणि मोसंबी संशोधन केंद्र या कार्यालयांच्या प्राचार्य आणि प्रमुखांची आढावा बैठक मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १० जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झाली. बैठकीमध्ये मा. कुलगुरुंनी येणाऱ्या खरीप हंगामामध्ये निर्धारित बीजोत्पादनासाठीचा तसेच मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेतला. याबरोबरच येणाऱ्या खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करण्यासाठी विविध उपाययोजना सुचवून मार्गदर्शन केले तसेच नवीन मंजूर प्रकल्पामधील वेगवेगळ्या मंजुऱ्या आणि वेळेत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी त्यांनी नुकत्याच अकोला येथे झालेल्या ५२ व्या संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीमध्ये शिफारशी आणि वाण प्रसारित झाल्याबद्दल सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. बैठकीसाठी सहयोगी अधिष्ठाता डॉ. राकेश अहिरे, प्रभारी अधिकारी डॉ. जी. एम. वाघमारे, डॉ. एस. बि. पवार, डॉ. डी. के. पाटील, डॉ. संजय पाटील, विद्यालायचे प्राचार्य डॉ. पंडित मुंडे संशोधन केंद्राचे डॉ के.टी. जाधव यांची उपस्थिती होती.