प्रकल्पग्रस्त
शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचा संवाद.
यावेळी परभणीचे माननीय जिल्हाधिकारी श्री आण्णासाहेब
चव्हाण आणि माननीय श्री संजयसिंह चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
रविवार, दिनांक १ नोव्हेंबर २०२६ रोजी शेंद्रा (नवीन),
ता. जि. परभणी येथे आयोजित या संवाद कार्यक्रमास प्रकल्पग्रस्त
गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेंद्रा, बलसा,
खानापूर व सायाळा येथील शेतकरी बांधवांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन
करण्यात आले होते.
यावेळी माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधताना
शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळणे,
त्यांच्या हक्कांचे संरक्षण होणे तसेच विकासप्रक्रियेत
प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य मिळणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन
केले. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी
योग्य मार्गदर्शन व सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
पुढे बोलताना
माननीय कुलगुरू म्हणाले की, प्रकल्पग्रस्तांच्या
सर्व पात्र जागा भरण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सर्व प्रकल्पग्रस्त
शेतकऱ्यांचे सहकार्य आवश्यक आहे. विद्यापीठाने प्रकल्पग्रस्त गावकऱ्यांवर कोणतेही
उपकार केले नसून, त्यांना त्यांचा न्याय्य हक्क मिळवून
देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. या महत्त्वपूर्ण कार्यात परभणीचे तत्कालीन
जिल्हाधिकारी श्री. संजयसिंह चव्हाण यांचे अनमोल सहकार्य लाभले, ही विशेष उल्लेखनीय बाब आहे. या संपूर्ण प्रक्रियेत आपण कोणतेही असाधारण
कार्य केले नसून, केवळ आपले कर्तव्य पार पाडले आहे, अशी विनम्र भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच, भविष्यातही
या प्रक्रियेच्या पूर्ततेसाठी परभणीचे विद्यमान जिल्हाधिकारी श्री. आण्णासाहेब
चव्हाण यांचे सहकार्य लाभेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त
केली.
या कार्यक्रमास परिसरातील शेतकरी, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांनी एकत्रितपणे पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या या कार्यक्रमात मान्यवरांचा सत्कार करून मान्यवरांप्रती कृतज्ञता आणि आदरभाव व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन किशोर ढगे यांनी केले. यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांच्या वतीने मान्यवरांचा सन्मान करून त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
.jpeg)
.jpeg)
