भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणीचे सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त विद्यापीठांतर्गत असलेल्या बदनापुर (जि जालना) येथील कृषी विज्ञान केंद्र आणि परभणी येथील अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प (गृह विज्ञान) यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय कन्या दिवसाचे औजित्य साधुन किशोरवयीन मुलींचे आरोग्य याविषयावर दिनांक २५ जानेवारी रोजी ऑनलाईन मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात औरंगाबाद येथील विभागीय आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या डॉ रेखा गायकवाड व वरिष्ठ संशोधिका (गृह विज्ञान) डॉ निता गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.
किशोरवयीन मुलींचे आरोग्य व आहार
यावर मार्गदर्शन करतांना प्राचार्या डॉ. रेखा गायकवाड किशोरवयीन मुलींच्या शरीराची
योग्य वाढाकरिता आहारात सर्व अन्न घटकांचा समावेश आवश्यक असून याच वयात आहार विषयक
चुकीच्या सवयी लागू शकतात. शक्ती मिळवण्यासाठी योग्य आहाराबरोबरच चांगल्या मानसिक
वाढीसाठी खेळ, वाचन असे छंद जोपासण्याची गरज असल्याचे त्या
म्हणाल्या. तर वरिष्ठ संशोधिका (गृह विज्ञान) डॉ. नीता गायकवाड यांनी मुलींची
सद्यस्थिती व किशोरवयीन मुलींमधील शारीरिक व मानसिक बदल या विषयावर मार्गदर्शन करतांना
म्हणाल्या की मुलींचा सामाजिक, बौद्धिक, मानसिक व नैतिक दर्जा वाढविण्यासाठी पालकांनी विशेष प्रयत्न करणे गरजेचे असुन
मुलींची भ्रूण हत्या थांबवणे आवश्यक आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विषय विषेशज्ञ (गृह विज्ञान) डॉ. साधना उमरीकर यांनी केले. ऑनलाईन कार्यक्रमात ९० पेक्षा जास्त मुली व पालकांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषी विज्ञान केंद्र, बदनापूरच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.