मार्गदर्शनात प्राचार्य डॉ. उदय खोडके यांनी नाहेप प्रकल्पा विषयी मार्गदर्शन करून नाहेप प्रकल्पात असलेले अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञान, कॉम्पुटर एडेड डिझाइन सॉफटवेअर, जीआयएस, ड्रोन, रोबोट, स्वयंचलीत यंत्रे, थ्रीडि प्रिंटर आदींचा सखोल अभ्यास करण्याचे आवाहन केले तर अध्यक्षीय भाषणात डॉ. गोपाळ शिंदे प्रशिक्षणात अवगत केलेल्या ज्ञानाचा उपयोग करुन कृषि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी प्रकल्प अहवाल तयार करण्याचे आवाहन केले.
सदरिल प्रशिक्षणात नाहेप प्रकल्पातील शास्त्रज्ञ डिजिटल शेती यावर मार्गदर्शन करणार असुन प्रशिक्षणाचे आयोजन कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण, शिक्षण संचालक डॉ. डी. एन. गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. गोपाळ शिंदे, डॉ. बी. एस.आगरकर आणि इंजी. डि. व्हि. पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात इंजी. डि. व्हि. पाटील यांनी प्रशिक्षणाचा उद्देश व आराखडा थोडक्यात विशद केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. अनिकेत वाईकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी इंजी. रवीकुमार कल्लोजी, इंजी खेमचंद कापगते, डॉ. अविनाश काकडे, डॉ. हेमंत रोकडे, इंजी. शिवानंद शिवपुजे, डॉ. शिवराज शिंदे, इंजी. विश्वप्रताप जाधव, इंजी. गोपाळ रणेर, श्री. रामदास शिंपले, मुक्ता शिंदे, मारोती रणेर, गंगाधर जाधव, जगदीश माने आदींनी सहकार्य केले.