वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्या ग्रामीण कृषि मौसम सेवा प्रकल्पाच्या वतीने हिंगोली जिल्हयातील तोंडापुर येथील कृषि विज्ञान केंद्रात दिनांक ६ जानेवारी रोजी “शेतकऱ्यांसाठी हवामान आधारित कृषि सल्ला” या विषयावर शेतकरी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास ग्रामीण कृषि मौसम सेवेचे प्रकल्प समन्वयक डॉ. के. के. डाखोरे, कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. पी. पी. शेळके, संशोधन सहयोगी श्री. प्रमोद शिंदे, हवामान निरीक्षक श्री. ए. आर. शेख, श्री. डी. आर. बोबडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात डॉ. कैलास डाखोरे म्हणाले की, परभणी विद्यापीठाच्या
वतीने दर मंगळवारी व शुक्रवारी प्रसध्द होणारी कृषि हवामान सल्ला पत्रिका ही एक हवामान
अंदाजाबद्दल नियमितपणे माहिती मिळविण्याचे खात्रीशीर स्त्रोत आहे. कृषि हवामान
सल्ला पत्रिकेव्दारे कमी कालावधीच्या, मध्यम कालावधीच्या व दीर्घ कालावधीच्या
हवामान अंदाजाबद्दल वर्तविण्यात येऊन पिकांच्या व्यवस्थापनाबाबत माहिती दिली जाते.
यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांनी कृषि हवामान सल्ला मिळविण्याकरिता मेघदूत ॲप व
विजांच्या माहितीसाठी दामिनी ॲपचा वापर करावा असे आवाहन केले.
डॉ. पी. पी. शेळके यांनी शेतकऱ्यांना ते स्वत: कित्येक
वर्षापासून हवामान आधारित कृषि सल्ल्याचा वापर करतात व तो शेतकऱ्यांपर्यंतही पोहोचवत
आल्याचे सांगितले. तसेच मनोगतात शेतकरी श्री. गोरखनाथ हाडोळे यांनी हवामान आधारित
कृषि सल्ला हा शेतकऱ्यांसाठी उपयूक्त असून व्यवहार्यता वाढत असल्याचे सांगितले.
भविष्यात शेतकऱ्यांना मंडळ निहाय तसेच तालूका निहाय सल्ला प्राप्त झाल्यास तो अधिक
उपयोगाचा ठरू शकेल असे सांगितले.
यावेळी श्री प्रमोद शिंदे यांनी “हवामान आधारित शेती व्यवस्थापन” या पुस्तकाचे वाटप केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. अनिल ओळंबे तर आभार प्रा. अजयकुमार सुगावे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी श्री. ए. आर. शेख, श्री. प्रमोद शिंदे, श्री. दत्ता बोबडे, कृषि विज्ञान केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. अनिल ओळंबे तर आभार प्रा. अजयकुमार सुगावे यांनी केले. सदरिल कार्यक्रम यशस्विरित्या पार पाडण्यासाठी श्री. ए. आर. शेख, श्री. प्रमोद शिंदे, श्री. दत्ता बोबडे व कृषि विज्ञान केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. प्रशिक्षणात पन्नास पेक्षा जास्त शेतकरी बांधव सहभागी झाले होते.