वनामकृवितील कृषि विद्या विभागात सेंद्रीय शेतीवर मार्गदर्शन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठातील कृषी विद्या विभाग, कृषी
महाविद्यालय, परभणी येथे परभणी चाप्टर इंडियन
सोसायटी ऑफ अग्रोनोमीच्या वतीने दिनांक २२ जुन रोजी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण
कृषी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. पी एस बोडके यांचे हवामान अनुकूल सेंद्रीय शेती
या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन शिक्षण संचालक डॉ.
धर्मराज गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. मार्गदर्शनात डॉ पी एस बोडके सेंद्रिय
शेतीमध्ये पिकांची फेरपालट, जैवविविधता, आच्छादनांचा वापर, रसायन
अवशेष मुक्त पीक उत्पादन यावर मार्गदर्शन केले. येणाऱ्या काळात देशातील
अन्नधान्याच्या गरजा भागविण्यासाठी एकात्मिक पीक नियोजन करणे आवश्यक असल्याचे सांगितले. कार्यक्रमास विभाग
प्रमुख डॉ.वासुदेव नारखेडे व विभागातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित
होते.