वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत तुळजापूर येथे असलेल्या कृषि विज्ञान केंद्रच्या प्रक्षेत्रास १४०० मीटर लांब आणि १.८ मीटर उंचीच्या आरसीसीमध्ये संरक्षण भिंतीचे बांधकाम फेब्रुवारी २०२४ मध्ये सुरु करण्यात आलेले आहे. सदरील काम विद्यापीठाची तुळजापूर येथील राष्ट्रीय महामार्ग विकासासाठी वापरण्यात आलेल्या जमिनीच्या प्राप्त महसुलात करण्यात येत आहे. याकामाचे गुण नियंत्रणासाठी मानके ठरविण्यात आलेले आहेत. त्या मानकाप्रमाणे कामाचा दर्जाचे निरीक्षण दिनांक ०३ एप्रिल रोजी प्रत्यक्ष कामाच्यास्थळी जावून विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी केले. यावेळी संचालक विस्तार शिक्षण डॉ. धर्मराज गोखले, विद्यापीठ अभियंता इंजिनियर श्री. दीपक कशाळकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. मोहन पाटील उप-विद्यापीठ अभियंता डॉ. दयानंद टेकाळे, शाखा अभियंता श्री. ढगे आणि कृषी विज्ञान केंद्र तुळजापूरचे कार्यक्रम समन्वयक इंजि. सचिन सूर्यवंशी आदींची प्रमुख उपस्थिती होती. चालू असलेल्या संरक्षण भिंतीचे बांधकाम अंदाजपत्रकात दिलेल्या मानकाप्रमाणे काम होते किंवा कसे याचे निरीक्षण केले, तेव्हा सदरील काम मानकाप्रमाणे आणि समाधानकारक होत असल्याचे निदर्शनास आले. याबरोबरच प्रत्यक्ष कामाचे ठिकाणी कामाचा गुणात्मक दर्जा उत्कृष्ठ ठेवण्याच्या सूचना माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी संबधीत यंत्रणेस दिल्या.