वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि यांनी दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी तुळजापूर (जिल्हा धाराशीव) येथील
श्री तुळजाभवानी मातेला विद्यापीठ तसेच राज्यातील शेतकऱ्यांच्या शांती, समृद्धी आणि संपन्नतेसाठी भावपूर्ण पूजाअर्चा केली.
या प्रसंगी माननीय कुलगुरूंनी देवीचे दर्शन घेत “शेतकरी देवो भव:” या
भावनेचा उच्चार करत, कृषि विद्यापीठाच्या माध्यमातून
प्रत्येक शेतकऱ्याच्या सर्वांगीण विकासासाठी सतत आणि समर्पित प्रयत्न करत
राहण्याचा संकल्प व्यक्त केला. माननीय कुलगुरूंनी तुळजाभवानी मातेकडे विद्यापीठ,
संशोधक, विद्यार्थी आणि सर्व शेतकरी
बांधवांच्या आरोग्य, प्रगती व कल्याणासाठी विशेष प्रार्थना
केली. या पूजाअर्चेद्वारे त्यांनी शेतकरी सक्षमीकरण, तंत्रज्ञानाचा
प्रसार आणि नवीन कल्पनांच्या माध्यमातून ग्रामीण भारताच्या विकासाचा संदेश दिला.
या प्रसंगी विद्यापीठातील शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण
संचालक डॉ. राकेश अहिरे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. संजीव बंटेवाड,
विस्तार कृषि विद्यावेत्ता प्रा. अरुण गुट्टे, कार्यक्रम समन्वयक डॉ. सचिन सूर्यवंशी तसेच पडोळी येथील रेशीम क्षेत्रातील
प्रगतशील शेतकरी श्री बालाजी पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
या पूजनावेळी शेतकरी हा आपल्या राष्ट्राचा कणा आहे. त्याच्या प्रगतीतूनच ग्रामीण भारत समृद्ध होईल, असे मत माननीय कुलगुरू यांनी व्यक्त केले. त्यांनी शेतकऱ्यांच्या आयुष्यात समृद्धी आणण्यासाठी ज्ञान, विज्ञान आणि श्रद्धा या तिन्हींचा संगम साधण्याचे उपस्थितांना आवाहन केले. श्री. तुळजाभवानी मातेकडे विद्यापीठ आणि राज्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या कल्याणासाठी माननीय कुलगुरू आणि उपस्थित मान्यवरांनी प्रार्थना करण्यात आली.