वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात राष्ट्रीय छात्रसेनेच्या ५२ महाराष्ट्र बटालियन, नांदेड यांच्या वतीने परभणी कृषि महाविद्यालय व श्री शिवजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्रसैनिकांकरिता दिनांक ४ ते १० डिसेंबर दरम्यान वार्षिक प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते, सदरिल शिबीराची सांगता दिनांक १० डिसेंबर रोजी झाली, सांगता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ सय्यद इस्माईल हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन श्री शिवाजी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ एस एन केशेट्टी हे उपस्थित होते. सुभेदार गोपाल सिंग, नायब सुभेदार लाल मोहम्मद, लेफ्टनंट डॉ प्रशांत सराफ, लेफ्टनंट डॉ जयकुमार देशमुख, सिनियर अंडर ऑफिसर ज्ञानेश्वर पवार, पंढरीनाथ पडुळे, अभिमन्यू भगत, शिव सरकटे आदींची उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात डॉ सय्यद ईस्माईल म्हणाले की, छात्रसेनेत एकात्मता, तत्परता, अनुशासन आणि देशभक्ती याचे शिक्षण मिळते. याच शिक्षणाचा उपयोग भविष्यात ज्या क्षेत्रात आपण काम करतो त्याठिकाणी आपल्या वैयक्तिक जीवनात होतो, तर डॉ एस एन केशेट्टी यांनी छात्रसेनेच्या प्रशिक्षणामुळे जीवन जगण्याची नवी दिशा प्राप्त होते असे प्रतिपादन केले. मार्गदर्शनात सुभेदार गोपाल सिंग म्हणाले की, शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम आणि सामाजिक दायत्वाचे शिक्षण शिबिराच्या माध्यमातून मिळते. छात्रसैनिकांनी मानसिक आणि शारीरिकदृष्टया सक्षम राहिले पाहिजे.
सांगता कार्यक्रमाच्या प्रारंभी शहीद सीडीएस बिपीन रावत व इतर शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली. शिबीराकरिता कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, कमांडिंग ऑफिसर श्री वेत्रीवेल, प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. सदरील प्रशिक्षण संचलित करण्याकरिता आलेल्या बटालियनचे सुभेदार गोपाल सिंग, नायब सुभेदार लाल मोहम्मद, हवालदार सुनीलकुमार आणि योगेशकुमार यांचा सत्कार करण्यात आला. शिबिरा दरम्यान उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या छत्रसैनिकांना पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत सातपुते याने केले तर आभार संजय येवले यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता एनसीसी गीताने करण्यात आली. सात दिवसीय शिबिराच्या यशस्वीतेसाठी लेफ्टनंट डॉ. जयकुमार देशमुख, लेफ्टनंट डॉ. प्रशांत सराफ, सिनियर अंडर ऑफिसर ज्ञानेश्वर पवार, पंढरीनाथ पडुळे, अभिमन्यू भगत,शिव सरकटे व इतरांनी परिश्रम घेतले. शिबीरात १५० छात्रसैनिक सहभागी झाले होते. शिबिरात छात्र सैनिंकांना ड्रिल, शस्त्र कवायत, फायरिंग, नकाशा अध्ययन, अंबुश (घात), पॅट्रोल यासह आपत्कालीन व्यवस्थापन, आत्मरक्षा, नागरी सुरक्षा, परिसर स्वछता या विविध विषयासह, भारतीय सैन्याचा इतिहास या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.