वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात राष्ट्रीय
छात्रसेनेच्या ५२ महाराष्ट्र बटालियन, नांदेड यांच्या वतीने परभणी कृषि महाविद्यालय व श्री शिवाजी महाविद्यालय
यांच्या राष्ट्रीय छात्रसैनिकांकरिता दिनांक ४ ते १०
डिसेंबर दरम्यान वार्षिक प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले असुन दिनांक ७
डिसेंबर रोजी विद्यापीठातील खानापुर
अ ब्लॉक परिसरामध्ये ०.२२ रायफलद्वारे फायरिंग चा सराव घेण्यात आला, या फायरिंग सरावाकरिता एकूण १३० छात्रसैनिकांनी सहभाग घेतला. सरावा दरम्यान
छात्रसैनिंकांना शस्त्र हाताळणे, टार्गेटवर अचूक निशाणा साधने, शस्त्राची साफसफाई इत्यादी शास्त्रोक्त पद्धतीने प्रशिक्षण
देण्यात आले. सरावा दरम्यान शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, कमांडिंग ऑफिसर श्री
वेत्रीवेलू, सहयोगी
अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव भेट देऊन मार्गदर्शन केले. सदरील प्रशिक्षण
बटालियनचे सुभेदार गोपाल सिंग, नायब सुभेदार लाल मोहम्मद, हवालदार सुनीलकुमार आणि योगेशकुमार यांनी दिले आहेत.
लेफ्टनंट डॉ. जयकुमार देशमुख यांनी सूत्रसंचालन केले व लेफ्टनंट डॉ. प्रशांत सराफ
यांनी मान्यवरांचे आभार मानले. सिनियर अंडर ऑफिसर ज्ञानेश्वर पवार, पंढरीनाथ पडुळे, शिव सरकटे, चंद्रकांत सातपुते, कॅडेट अभिमन्यू भगत, इस्रायल पठाण आदीसह छात्रसैनिंकांनी परिश्रम घेतले.
Public Relations Officer, Directorate of Extension Education, Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani - 431 402 (M.S.) (Maharashtra) INDIA