वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्तार शिक्षण संचालनालयाच्या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र व औरंगाबाद येथील कृषि सारथी शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 6 डिेसेंबर ते 8 डिसेंबर दरम्यान नाबार्ड पुरस्कृत तीन दिवसीय शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षणाच्या उद्घाटन दिनांक 6 डिसेंबर रोजी झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर हे तर कृषि सारथी शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रकल्प व्यवस्थापक श्री नारायण जराड, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ व्ही बी कांबळे, विस्तार कृषि विद्यावेत्ता तथा व्यवस्थापक डॉ.जी.डी.गडदे, किटकशास्त्रज्ञ डॉ डी डी पटाईत आदींची उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात डॉ. डी. बी. देवसरकर म्हणाले कि, विद्यापीठाव्दारे विकसीत तुरीचे,
सोयाबीनचे विविध वाण राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात शेतक-यांमध्ये
प्रचलित आहेत. शेतक-यांनी शेती विषयक तांत्रिक अडचणी नुसार विद्यापीठ प्रशिक्षण आयोजित करते. विद्यापीठाचे
विविध वाण, तंत्रज्ञान निश्चीतच शेतक-यांचे उत्पन्न वाढी
करता महत्वाची भुमिका बजावत आहेत. प्रशिक्षणाचा लाभ घेऊन आपल्या संपर्कातील इतर
शेतक-यांना विषयी माहिती देऊन या तंत्रज्ञानाचा प्रसार करावा, असा सल्ला त्यांनी
दिला.
प्रमुख पाहूणे श्री.जराड यांनी त्यांच्या
संस्थेमार्फत घेण्यात येणारे विविध उपक्रम माहिती दिली. प्रास्ताविक डॉ.जी.डी.गडदे
यांनी केले. सुत्रसंचालन श्री.मधुकर मांडगे यांनी केले तर आभार प्रदर्शन सहाय्यक
कीटकशास्त्रज्ञ डॉ. डी. डी. पटाईत यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ.मधुमती
कुलकर्णी व केंद्रातील कर्मचा-यांनी सहकार्य केले.
प्रशिक्षणाकरिता मौजे उज्जेनपुरी (ता.बदनापुर जि.जालना) येथील 25 शेतकरी सहभागी झाले असुन प्रशिक्षणार्थींना मागणी आधारीत रबी पिक व्यवस्थापन, दुग्धव्यवसाय, शेळीपालन, ऊस लागवड, कांदा लागवड, मधुमक्षिका पालन, कीड नियंत्रण या विविध विषयावर व्याख्यान व प्रात्याक्षिकाव्दारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.