परभणी कृषि महाविद्यालय व श्री शिवाजी
महाविद्यालयाच्या १५० छात्रसैनिकांचा सहभाग
शिबिरात परभणी येथील कृषि महाविद्यालय
व श्री शिवाजी महाविद्यालय यांच्या १५० विद्यार्थां सहभागी झाले आहेत. शिबिरामध्ये
छात्र सैनिंकांना ड्रिल, शस्त्र कवायत, फायरिंग, नकाशा अध्ययन, अंबुश (घात), पॅट्रोल यासह आपत्कालीन व्यवस्थापन, आत्मरक्षा, नागरी सुरक्षा, परिसर स्वछता आदी विविध विषयासह, भारतीय सैन्याचा इतिहास या विषयावर
सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दिनांक ७ डिसेंबर रोजी शिबिरार्थी छात्र सैनिंकाकरिता
फायरिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, यामध्ये विद्यार्थ्यांना ०.२२ रायफलद्वारे फायरिंग करण्याची संधी
मिळणार आहे. शिबिरातून कम्बाईन डिफेन्स सर्व्हिस, भारतीय सैन्य दल, केंद्रीय व राज्य राखीव दल इत्यादी
परीक्षेच्या निवडीसाठी सराव होणार आहे. राष्ट्रीय छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांकरिता
अल्पोपहार व भोजन व्यवस्था बटालियनच्या वतीने करण्यात आलेली असुन इतर सुविधा कृषि महाविद्यालयाच्या
वतीने पुरविण्यात आल्या आहेत. सदरिल शिबीर आयोजनाकरिता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठाचे माननीय कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, कमांडिंग ऑफिसर श्री वेत्रीवेलू , परभणी कृषि महाविद्यालायाचे सहयोगी
अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव यांचे
मार्गदर्शन लाभले आहे. बटालियनचे सुभेदार गोपाल सिंग, नायब सुभेदार लाल मोहम्मद, हवालदार सुनीलकुमार, योगेशकुमार हे प्रशिक्षण संचलित करित
असुन शिबिराच्या यशस्वीतेसाठी लेफ्टनंट डॉ. जयकुमार देशमुख, लेफ्टनंट डॉ. प्रशांत सराफ, सिनियर अंडर ऑफिसर ज्ञानेश्वर पवार, पंढरीनाथ पडुळे, शिव सरकटे, चंद्रकांत सातपुते आदी परिश्रम घेत
आहेत.