अमरावती जिल्हयातील आदिवासी बहुल मौजे लवादा येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात प्रतिपादन
कृषि तंत्रज्ञान केवळ सर्वसामान्य शेतक-यांपर्यंत मर्यादीत न राहता, राज्यातील दुर्लक्षित भागातील आदिवासी शेतक-यांत पर्यंतही पोहचले पाहिजे. परभणी कृषि विद्यापीठाच्या वतीने काही दत्तक गांवातील आदिवासी शेतकरी बांधवाना विद्यापीठ विकसीत औजारांचे वाटप करण्यात आले. या औजारामुळे शेतकरी बांधवाचे वेळ व श्रमात बचत तर होतेच, शेती निविष्ठातही बचत होते. या यांत्रिकीकरणामुुुळे आदिवासी शेतक-यांचे शेती उत्पादन व उत्पन्न मोठी वाढ होऊन आर्थिकस्तर उंचावत आहे, आदिवासी शेतक-यांचे उत्पादन दुप्पट करण्याकरीता वनामकृवि विकसित कृषि औजारांचे बहुमुल्य योगदान असल्याचे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी केले.
परभणी येथील वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठ व अमरावती जिल्हयातील घातखेडा येथील कृषि विज्ञान केंद्र
यांच्या संयुक्त विद्यमाने पशुशक्तीचा योग्य वापर प्रकल्पाच्या आदिवासी उपयोजनें
अंतर्गत मौजे लवाद (ता धारणी
जि अमरावती) येथे आदिवासी शेतक-यांकरीता शेतकरी मेळाव्याचे आयोजन दिनांक
११ डिसेंबर रोजी करण्यात आले होते, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
व्यासपीठावर प्रमुख अतिथी
म्हणुन डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ विलास भाले, स्वागताध्यक्षा
माजी राज्यमंत्री तथा श्रमसाफल्य फाउंडेशनच्या अध्यक्षा मा श्रीमती वसुधाताई देशमुख, मेळघाट येथील
आमदार मा श्री राजकुमार पटेल, पद्मश्री मा डॉ रविंद्र कोल्हे, पद्मश्री
मा श्रीमती राहीबाई पोपरे, भोपाळ येथील पशुशक्तीचा योग्य वापर प्रकल्पाच्या समन्वयक
डॉ महाराणी दीन, अमरावती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री अनिल खर्चान, वनामकृविचे
संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर,
डॉ पंदेकृविचे विस्तार शिक्षण संचालक डॉ राजेंद्र गाडे, सहकार महर्षी
नानासाहेब भिेसे, माजी आमदार श्री केवलराम काळे, डॉ स्मिता
सोळंकी, डॉ अतुल कळसकर आदींची
प्रमुख उपस्थिती होती.
स्वागतपर भाषणात माजी राज्यमंत्री
मा श्रीमती वसुधाताई देशमुख यांनी श्रमसाफल्या फाउंडेशन हे मेळघाट मधील आदिवासी शेतकरी
विकासाकरिता कटिबध्द असल्याचे सांगितले तर मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ विलास भाले
यांनी परभणी कृषि विद्यापीठ आदिवासी शेतक-यांना सुधारित औजारे देऊन करित असलेल्या
कामाबद्दल समाधान व्यक्त करून मेळघाट पॅर्टन कृषिक्षेत्रात विकसित करून राबविण्याचे
आवाहन केले. आमदार मा राजेंद्र पटेल यांनी आदिवासी शेतक-यांनी वनामकृवि विकसीत औजारांचा
योग्यरित्या वापर करण्याचे आवाहन केले तर पद्मश्री मा डॉ राजेंद्र कोल्हे यांनी
शेतक-यांना बहुमुल्य असे अनुभव कथन करून मार्गदर्शन केले. पद्मश्री श्रीमती राहीबाई
पोपरे यांनी आदिवासी शेतकरी महिलांनी देशी बियाण्याची जपणुक करण्याचा सल्ला दिला.
मेळाव्यात आदिवासी शेतक-यांना परभणी कृषि विद्यापीठ विकसित बैलचलित व मनुष्यचलित कृषि औजारांचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तसेच परभणी कृषि विद्यापीठ विकसित औजारांचा उत्कृष्ट वापर करून शेती उत्पन्नात वाढ करणा-या आदिवासी शेतक-यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
प्रास्ताविकात संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर यांनी परभणी कृषि विद्यापीठ आदिवासी शेतक-यांकरिता असलेल्या कार्याची माहिती दिली. सुत्रसंचलन प्रा विनय वसुले यांनी केले तर आभार डॉ स्मिता सोळंकी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ अतुल कळसकर यांच्यासह अमरावती कृषि विज्ञान केंद्र व परभणी विद्यापीठातील शास्त्रज्ञ व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. मेळाव्यास आदिवासी शेतकरी बांधव व महिला मोठया संख्येने उपस्थित होते, याप्रसंगी कृषि प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले होते.