Tuesday, December 14, 2021

वनामकृवित मधमाशी पालन प्रशिक्षण कार्यक्रम संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि कीटकशास्त्र विभाग व महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 10 डिसेंबर रोजी मधमाशी पालन व मध केंद्र योजना जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमास प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल व कुलसचिव डॉ. धीरजकुमार कदम यांची विशेष उपस्थिती होती तर विभाग प्रमुख डॉ. संजीव बंटेवाड, प्राध्‍यापक डॉ. पी. एस, नेहरकर, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी श्री. टी. जी. यादव, मध पर्यवेक्षक  श्री. डी. व्ही. सुत्रावे, डॉ. मिलिंद सोनकांबळे, डॉ. अनंत लाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल यांनी शेतकरी बांधवाच्‍या शेतीत शाश्‍वतेसाठी व आर्थिक स्‍थैर्य करिता शेतीपुरक व्यवसाय करणे आवश्‍यक असुन मधमाशी पालन, रेशीम उदयोग यामध्‍ये मोठा वाव असल्‍याचे सांगितले तर कुलसचिव डॉ धीरजकुमार कदम यांनी सामान्य जीवनात मधमाशीचे महत्व विषद केले. डॉ. संजीव बंटेवाड यांनी मधमाशीचे महत्व अधोरेखित केले तसेच मधमाशी पालन व त्यावरील कीटकनाशकांचा परिणाम या विषयी माहिती दिली. 

तांत्रिक सत्रात डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी मधमाशांच्या प्रजाती, मधमाशांचा जीवनक्रम आदी विषयी चित्रफितीद्वारे सखोल माहिती दिली तसेच प्रात्यक्षिकाद्वारे शेतकर्‍यांना व उपस्थितांना मधमाशांच्या विविध बाबींविषयी अवगत केले. श्री. टी. जी. यादव यांनी खादी ग्रामोद्योग मंडळाच्या विविध योजनांबद्दल माहिती दिली तर श्री. डी. व्ही. सुत्रावे यांनी मधकेंद्र योजना व मध उत्पादन या बद्दल माहिती दिली.  डॉ. मिलिंद सोनकांबळे, डॉ. अनंत लाड व डॉ. चंद्रकात लटपटे यांनीही शेतक-यांना मार्गदर्शन केले. निवृत्त सहयोगी प्राध्यापक डॉ. एस. एन. कुलकर्णी यांनी ऑनलाइन पद्धतीने मधमाशी परागीकरन आणि सपुष्प वनस्पती जीवनाबद्दल माहिती दिली.

सदरिल कार्यक्रमाकरिता कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण व संचालक शिक्षण डॉ. धर्मराज गोखले यांनी शुभेच्छा दिल्या. सुत्रसंचलन डॉ अनंत लाड यांनी केले तर आभार डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी मानले. कार्यक्रमाचा लाभ 80 शेतकरी व कृषि उद्योजक यांनी घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. राजरातन खंदारे, डॉ. संजोग बोकण, अनुराग खंदारे, बालाजी कोकणे, प्रल्हाद बदाले, शालिग्राम गांगुर्डे, दिपक लाड, योगेश विश्वंभरे, सुरेश शिंदे, सोपान ढगे, शेख अली आदीसह पद्व्युतर विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.