Monday, December 6, 2021

वनामकृवित आंतरराष्‍ट्रीय मृदा दिन साजरा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील भारतीय मृद विज्ञान संस्था शाखा परभणी व मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभाग यांच्या वतीने दिनांक ५ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय मृदा दिना साजरा करण्‍यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु मा डॉ. अशोक ढवण हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन कृषि विद्यापीठाचे माजी शिक्षण संचालक डॉ. विलास पाटील, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, विभाग प्रमुख डॉ. प्रविण वैद्य, प्रमुख अन्वेषक डॉ. अनिल धमक आदीची उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण म्हणाले की, जमिनीचे क्षारता संशोधन व व्यवस्थापनाव्दारे थांबवीता येते. नवसंशोधकांनी मृदशास्त्रातील नवीनतम विषयातील संशोधन इतर विभागाशी सलग्न राहुन करणे काळाची गरज आहे. कोरडवाहु शेतीत पिक उत्पादकता टिकविण्याचे मोठे आव्हान असुन शेतक­यांनी सेंद्रीय खते, हिरवळीच्या खतांच्या वापर करावा. शेतक-यांनी दरवर्षी मातीचे आरोग्य तपासण्याचा सल्ला त्‍यांनी दिला.

मार्गदर्शनात माजी शिक्षण संचालक डॉ. विलास पाटील यांनी उत्पादनवाढीसाठी माती परिक्षण गरजेचे असल्याचे सांगितले. भावी पिढीच्या चांगल्या आरोग्यसाठी रासयनिक खतांचा समतोल वापर माती परिक्षणाच्या अहवालानुसार करण्याचा सल्ला दिला. सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल यांनी जमिनीत सुक्ष्म जिवांनुचा उपयोग करुन क्षारता कमी करता येते असे प्रतिपादन केले तसेच त्यावर सखोल संशोधन होणे गरजेचे आहे व पिक पध्दतीत व्दिदल पिकांचा समावेश करण्याचे सांगीतले

प्रास्‍ताविकात आयोजक डॉ. प्रविण वैद्य यांनी शाश्‍वत शेती करीता जमिनीच्या प्रकारानुसार पिकांची हवामान आधारीत विविध पिकांच्या वाणांची निवड करणे, अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढविणे व आरोग्यदायी जीवनासाठी आरोग्यदायी मृदा असणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले.

या प्रसंगी डॉ. प्रविण वैद्य व डॉ. रामप्रसाद खंदारे लिखित दिर्घकालीन खत प्रकल्पावरील घडीपत्रिकांचे  तसेच डॉ. अनिल धमक व डॉ. सय्यद इस्माईल लिखित जैविक खतावरील घडीपत्रीकेचे विमोचन करण्यात आले. प्रश्नमंजुषा व भित्तीपत्रक स्पर्धेतील प्रथम तिन विजेत्या विद्यार्थ्‍यांना मान्यवरांच्या हस्ते पारीतोषिक व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.

आंतरराष्‍ट्रीय मृदा दिनाचे औजित्‍य साधुन मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागातील विद्यार्थ्‍यांसाठी “जमिनीची क्षारता थांबवा जमिनीची उत्पादकता वाढवा” याविषीयावर प्रश्नमंजुषा आणि भित्तीपत्रक स्पर्धा घेण्यात आली. तसेच भारतिय मृद विज्ञान संस्था नवी दिल्ली, शाखा परभणी व स्मार्ट टेक टेक्नॉलॉजी पुणे (महाधन) यांच्या संयुक्त विद्यामाने दिनांक ४ डिसेंबर रोजी मौजे करडगाव (ता.जि. परभणी) येथे शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते. यात जमिनीचे आरोग्य उंचावण्याबाबत डॉ. प्रविण वैद्य, डॉ. निशीकांत इनामदार, डॉ. रामप्रसाद खंदारे यांनी मार्गदर्शन केले तसेच “जमिनीचे आरोग्य” या घडीपत्रीकेचे विमोचन व वितरण करण्यात आले. शेतक­यांना माती परिक्षण करीता नमुना गोळा करण्याचे प्रात्यक्षिके विद्यार्थ्‍यांमार्फत करुन दाखविण्यात आले, जैविक खतांचे बीज प्रक्रीयाकरण प्रात्यक्षिक डॉ. अनिल धमक यांनी करुन दाखवीले. विभागाच्‍या वतीने सदर गाव पुढील एक वर्षा करीता दत्तक म्हणुन घेण्‍यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. पपिता गौरखेडे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ अनिल धमक यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. सुरेश वाईकर, डॉ. महेश देशमुख, डॉ. सुदाम शिराळे, डॉ. स्वाती झाडे, डॉ. भाग्यरेषा गजभीये, डॉ. संतोष चिक्षे, डॉ. सय्यद जावेद जानी, डॉ. स्नेहल शिलेवंत, श्री भानुदास इंगोले, श्री अभीजीत पंतगे, श्री अजय चरकपल्ली तसेच पदव्युत्तर विद्यार्थी राकेश बगमारे, निखील पाटील, शुभम गीरडेकर, प्रियंका लोखंडे व एम.एस्सी विद्यार्थी यांनी सहकार्य केले.