चारही कृषि विद्यापीठाची संयुक्त कृषि संशोधन व विकास समितीची ४९ वी बैठक संपन्न
बैठकीत कृषि विद्यापीठांच्या ९ विविध पिकांच्या नवीन वाण, १५ कृषि अवजारांसह एकुण १९५ शिफारशींना मान्यता
राज्यातील चारही
विद्यापीठाच्या स्थापनेस ५० वर्ष पुर्ण झाले असुन संशोधनाच्या माध्यमातुन
विविध पिकांची अनेक वाण, कृषि अवजारे व कृषि तंत्रज्ञान शिफारसी विकसित
केले आहेत. हे संशोधन राज्यातील शेतकरी बांधवाच्या प्रगतीच्या दृष्टीने अत्यंत
मोलाचे आहे. शासन, कृषि विभाग व कृषि विद्यापीठे या
सर्वांचे उद्दीष्ट हे राज्यातील शेतकरी बांधवाची प्रगती करणे, त्यांच्या जीवनातील अडीअडचणी दुर करणे हाच असुन कृषि विद्यापीठात झालेले
संशोधन कृषि विभाग व कृषि विज्ञान केंद्रे यांच्या माध्यमातुन शेतकरी
बांधवापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. शेतकरी बांधवाच्या शेतात
हे संशोधन अवलंबताना येणा-या अडचणीचा आढावा घेऊन पुन्हा यात सुधारणा कराव्यात.
माननीय मुख्यमंत्री मा श्री उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या विकेल ते पिकेल संकल्पनेनुसार
विद्यापीठ विकसित विविध पिक वाण, यातील अधिक किंमत
देणारे वाण असेल पाहिजेत. दर्जेदार शेतमाल, शेतमाल मुल्यवर्धन, कृषि प्रक्रिया उद्योग आदींना पाठबळ देण्याचे कार्य शासन करीत आहे. कृषि विभागाच्या माध्यमातुन शेतमाल विक्री व्यवस्थापनावर कार्य चालु
आहे. जागतिक पातळीवरील उपयुक्त असे कृषि संशोधन राज्यातील शेतकरी बांधवांना
उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कृषि विद्यापीठाने प्रयत्न करावा, असा सल्ला कृषिमंत्री
तथा कृषि विद्यापीठेचे प्रतिकुलपती मा. ना. श्री. दादाजी
भुसे यांनी यांनी दिला.
महाराष्ट्रातील चारही
कृषि विद्यापीठांनी केलेले संशोधन शेतक-यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महत्वाचा टप्पा मानल्या
जाणा-या संयुक्त कृषि संशोधन व विकास समितीची ४९ वी बैठकीचे
आयोजन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी व
महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांच्या
संयुक्त विद्यमाने दिनांक २४ ते ३० डिसेंबर दरम्यान नाहेप प्रकल्पाच्या सहकार्याने आभासी माध्यमातुन करण्यात आले होते, सदरिल बैठकीच्या
समारोपीय कार्यक्रमा प्रसंगी (दि. ३० डिसेंबर) रोजी अध्यक्षीय भाषणात ते बोलत
होते.
सदरिल
कार्यक्रमास राज्याचे प्रधान सचिव (कृषि) मा श्री एकनाथ डवले, कृषि परिषदेचे महासंचालक
मा श्री विश्वजीत माने, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ अशोक ढवण, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. विलास भाले, दापोली
येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठाचे
कुलगुरु मा. डॉ. संजय सावंत, राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. प्रशांतकुमार पाटील, वनामकृविचे संशोधन संचालक
डॉ दत्तप्रसाद वासकर, डॉ पंदेकृविचे संशोधन संचालक डॉ व्ही के खर्चे, डॉ बासाकोकृविचे संशोधन संचालक डॉ पी एम हळदनकर, मफुकृविचे संशोधन संचालक डॉ एस आर गडाख, कृषि
परिषदेचे संशोधन संचालक डॉ हरिहर कौसडीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मा. ना. श्री. दादाजी
भुसे पुढे म्हणाले की, बदलास हवामानात शेतीचे मोठे नुकसान होत आहे, यावर
संशोधन करून संरक्षित शेतीवर भर दयावा लागेल. येणारे वर्ष २०२२ हे वर्ष शासन महिला
शेतकरी व महिला शेतमजुर वर्ष म्हणुन साजरे करणार आहे, त्याकरिता
शेतकरी महिला व महिला शेतमजुर यांना उपयुक्त कृषि तंत्रज्ञानाचा प्रसार व
प्रशिक्षण यावर भर देण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या आर्थिकस्थिती सुधारण्यादृष्टीने
विद्यापीठ विकसित वाण व इतर तंत्रज्ञानाच्या पेटंटकरिता प्रयत्न करावा. राज्यातील
अनेक शेतकरी आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करतात, या
यशस्वी शेतकरी बांधवाचे रिसोर्स बॅक तयार करण्यात आली आहे, या शेतकरी बांधवाच्या संशोधनाचा समावेश विद्यापीठ संशोधनात व्हावा.
कृषिचे विद्यार्थी केवळ नौकरीच्या मागे न लागता, नौकरी
देणारे उद्योजक झाले पाहिजे यासाठीही प्रयत्न करावा, असे
मत त्यांनी व्यक्त केले.
मार्गदर्शनात
राज्याचे प्रधान सचिव (कृषि) मा श्री एकनाथ डवले म्हणाले की, चारही कृषि
विद्यापीठाने प्रसारित केले वाण व इतर शिफारसी यांची माहिती संकेतस्थळावर
अद्ययावत कराव्यात, जेणे करून शेतकरी बांधवा त्याचा
लाभ घेता येईल. चारही कृषि विद्यापीठाने संशोधनाचा पुढील दहा वर्षाचे उद्दीष्ट
ठरवुन रोड मॅप तयार करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
कार्यक्रमात
कृषि परिषदेचे महासंचालक मा श्री विश्वजीत माने, कुलगुरू मा
डॉ अशोक ढवण, कुलगुरु मा. डॉ. विलास भाले, कुलगुरु मा. डॉ. संजय सावंत, कुलगुरु
मा. डॉ. प्रशांतकुमार पाटील
यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात विद्यापीठातील निवृत्त कृषि
संशोधकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच विविध पुस्तके, घडीपत्रिकांचे विमोचन करण्यात आले.
सुत्रसंचालन डॉ विणा
भालेराव यांनी केले तर आभार संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर यांनी मानले. एक
आठवडा चाललेल्या बैठकीत राज्यातील चारही कृषि वि़द्यापीठातील तीनशे पेक्षा शास्त्रज्ञांनी
सहभाग घेतला. कार्यक्रमातील तांत्रिक सत्रातील १२ गटांचा कार्यवृत्ताचे वाचन त्यात्या
गटाच्या समन्वयकांनी केले. सदरिल बैठकीत चारही कृषि विद्यापीठांच्या ९
विविध पिकांच्या नवीन वाण, १५ कृषि अवजारे व यंत्र आदीसह
एकुण १९३ संशोधन शिफारशींना मान्यता देण्यात आली, तसेच
राष्ट्रीय द्राक्ष संशोधन संस्था, मांजरी यांचा
द्राक्षाचा मांजरी किशमिश वाण व सोलापुर येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन संस्थेचा
डाळिंबाचा सोलापुर लाल या वाणास मान्यता देण्यात आली. सदरिल समितीची पन्नासावी बैठक पुढील वर्षी दापोली कृषि विद्यापीठात
आयोजित करण्यात येणार असुन त्यानिमित्त डॉ दत्तप्रसाद वासकर यांनी दापोली
संशोधन संचालक डॉ पराग हळदणकर यांना आयोजनाचा नारळ
प्रदान केला.
चारही कृषि विद्यापीठाच्या मान्य झालेल्या शेती पिके व फळ पिकांचे वाण
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या तीन विकसित वाणास लागवडी करिता मान्यता देण्यात आली, यात सोयाबीनच्या एमएयु-७२५, करडई पिकांचा परभणी सुवर्णा (पीबीएनएस-१५४) व रब्बी ज्वारी हुरडाच्या परभणी वसंत (पीव्हीआरएसजी-१०१) वाणास मान्यता देण्यात आली. महात्मा फुले कृषि विद्यापीठ विकसित रब्बी ज्वारीचा फुले यशोमती, उडीदाच्या फुले वसु, तीळाच्या फुले पुर्णा तर ऊसाच्या फुले-११०८२ या वाणास लागवडीकरिता मान्यता देण्यात आली. डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ विकसित भात पिकांची पीडीकेव्ही साधना व रब्बी ज्वारी हुरडाची ट्रॉम्बे अकोला सुरूची वाणास मान्यता देण्यात आली.
फळपिकात महात्मा फुले कृषि विद्यापीठ संशोधीत पेरू फळाच्या फुले अमृत तर चिंचाच्या फुले श्रावणी वाणास मान्यता देण्यात आली तर राष्ट्रीय द्राक्ष संशोधन संस्था, मांजरी यांचा द्राक्षाचा मांजरी किशमिश वाण व सोलापुर येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन संस्थेचा डाळिंबाचा सोलापुर लाल या वाणास मान्यता देण्यात आली.