Wednesday, January 4, 2023

राज्यस्तरीय सिल्लोड कृषी महोत्सवात शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद सिल्लोड (दि 4 जानेवारी 2023)

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आणि महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांना ५० वर्षे पूर्ण झाली असून या विद्यापीठ विकसित कृषी तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचविण्‍याच्‍या दृष्‍टीने कृषी विभागाच्‍या पुढाकाराने दिनांक जानेवारी ते जानेवारी दरम्‍यान राज्‍याचे कृषि मंत्री मा ना श्री अब्‍दुल सत्‍तार यांच्‍या संकल्‍पनेतुन सिल्लोड (जि.औरंगाबाद) येथे राज्यस्तरीय सिल्लोड कृषि महोत्सव २०२३ आयोजन करण्‍यात आले असुन या महोत्‍सवाच्‍या उदघाटन मुख्‍यमंत्री मा ना श्री एकनाथ शिंदे यांच्‍या शुभहस्‍ते झाले.

उदघाटनप्रसंगी रेल्‍वे, कोळसा व खाणी मंत्रालयाचे केंद्रीय राज्‍यमंत्री मा ना श्री रावसाहेब दानवे, केंद्रीय राज्‍यमंत्री (वित्‍त) मा ना डॉ भागवत कराड, राज्‍याचे फलोत्‍पादन मंत्री मा ना श्री संदीपान भुमरे, कृषीमंत्री मा ना श्री अब्‍दुल सत्‍तार, सहकार, इतर मागास बहुजन कल्‍याण मंत्री मा  ना श्री अतुल सावे, लोकसभा सदस्‍य मा श्री सय्यद इम्तियाज जलील, प्रधान सचिव (कृषी) मा श्री एकनाथ डवले, कृषि आयुक्‍त मा श्री सुनील चव्‍हाण, कुलगुरू (वनामकृवि, परभणी) मा डॉ इन्द्र मणि, कुलगुरू (डॉपंदेकृवि, अकोला) मा डॉ शरद गडाख आदींची प्रमुख उपस्थिती होती. एक जानेवारी पासून सुरू झालेला शेतकरी महोत्सव हा दिवसागणिक वाढत्या शेतकरी उपस्थितीने चैतन्यमय होत आहे. ग्रामीण शेतकऱ्यांना आपले शेती प्रश्न सोडविण्यासाठी एक पर्वणी ठरत आहे. दिनांक ४ जानेवारी चौथ्या दिवशीही शेतकऱ्यांचे जथ्ये राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून दाखल होत आहे अगदी विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यापासून ते थेट सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यत सर्व तालुक्यातील शेतकरी कृषी प्रदर्शनात भेट देत असल्याचे शेतकरी नोंद रजिस्टर घेतलेल्या आधारे लक्षात येत आहे.  कृषी विद्यापीठातील आणि कृषी  विभागातील दालनास भेट देणारे शेतकरी असंख्य प्रश्न विचारत आहेत. कापूस संशोधन केंद्रात भेट देणारे शेतकरी विचारतात की कापूस फरदड ठेवणे योग्य राहील काय. कडधान्य संशोधन केंद्राच्या दालनास  भेट देणारे कढधान्य पिकाच्या समस्या बाबत चर्चा करतात या चर्चेतून नवीन वाणाची नवीन पीक तंत्रज्ञान जाणून घेण्याचे प्रयत्न शेतकरी करतात. राहूरी कृषी विद्यापीठाच्या दालनात समोर उंच वाढणारे ऊस शेतकऱ्यांचे लक्षवेधी ठरलेले दिसली. तर कोकण कृषी विद्यापीठाची सुखी संसाराची झोपडी आवर्जून शेतकरी पाहतात अकोला कृषी विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान स्थानिक शेतकरी विचारपूस मोठ्या आवडीने  करतात. या व्यतिरिक्त खाजगी कंपनीचे दालने पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. आजच्या शेतकऱ्यांना कालानुरूप प्रश्न निर्माण होत आहे ते कसे सोडवता येतील, यासाठी दालनात उपस्थित असलेल्या तज्ज्ञांकडून माहिती जाणून घेत होती रासायनिक खताचा वाढत्या किंमती या शेतकऱ्यांसाठी मोठी समस्या असल्याची चर्चा शेतकरी आपसात करत होती. अवेळी येणारा पाऊस हा मागील काही वर्षांपासून खरिपाच्या पिकाचे नुकसान होत असल्याचे शेतकरी आपसात चर्चा करत होती. यासाठी नेमकी काय करता येऊ शकते याची चर्चा शेतकरी कृषी शासज्ञासोबत करत होती.

उद्या पाच जानेवारी कृषी प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे आणखीही जास्तीचे शेतकरी या शेवटच्या दिवसी उपस्थितीत राहतील असा दावा आयोजकांनी केला आहे. कृषी महोत्सव यशस्वीतेसाठी औरंगाबाद विभागाचे सहसंचालक डॉ दिनकर जाधव आणि त्यांचा चमू  सातत्याने अनेकांच्या संपर्कात राहून माहिती घेत आहे. आजच्या चर्चासत्रात अनेक विषयांवर कृषी शास्रज्ञानी मार्गदर्शन केले यात भारतातील शेतीमालाची निर्यात एक दृष्टीक्षेप, मसाला पिकांचे व्यवस्थापन, फळबाग लागवड, एकात्मिक शेती पद्धती या विषयाचा समावेश होता आज जवळपास एक लाख शेतकऱ्यांनी कृषी प्रदर्शनात हजेरी लावली.