Wednesday, January 4, 2023

वनामकृविच्‍या सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृहात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठा अंतर्गत सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृहात दिनांक जानेवारी रोजी भारतातील पहिली महिला शिक्षीका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमास कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सय्यद ईस्माईल यांची विशेष उपस्थिती होती तर मुख्य वसतिगृह अधिक्षक डॉ. राजेश कदम, सहाय्यक वसतिगृह अधिक्षक डॉ. गोदावरी पवार, वसतिगृह सहाय्यक श्रीमती सुनिता भुरके आदींंची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्‍यात आले.

मार्गदर्शनात प्राचार्य डॉ. सय्यद ईस्माईल म्‍हणाले की, कृषि शिक्षणाकडे मुलींचा ओढा वाढत आहे, सावित्रीबाई फुले यांच्‍या परिश्रम, त्‍याग व कार्यामुळेच आज मुलींच्‍या शिक्षणात प्रगती दिसत असुन याची जाणीव विद्यार्थीनींनी ठेवली पाहिजे. डॉ. राजेश कदम यांनी उपलब्ध असलेल्या शैक्षणीक साधनाचा उपयोग विद्यार्थ्‍यांनी स्वत:च्या उन्नतीसाठी करावा असे आवाहन केले.

यावेळी समृद्धी वांगसकर आणि सिध्दी भोसले यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर आणि शिक्षणातून महिला सक्षमीकरणाकडे या विषयावर मनोगत व्यक्त केले. सावली मोरे, दिपाली जाधव आदी विद्यार्थीनी दिपप्रज्वलन केले. सुत्रसंचालन मयुरी म्हस्के यांनी केले तर विजया पवार हीने आभार मानले. कार्यक्रमास सय्यद ईरफान, सी.बी. देसाई, गणेश ढगे, व्ही.ए. घोडके, मिराबाई मुंडे, विष्णू ढगे, डी.के. पांचाळ, सुनिल शिंदे, ज्ञानेश्वर जाधव, आदीसह कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.