या हंगामात शेतकरी बांधवांना विद्यापीठ विकसित तुरीचे वाण बीडीएन-७११ पासुन चांगले उत्पादन
फुलंब्री तालुक्यातील मौजे एकघर
पाडळी येथील युवक कृषी पदविकाधारक शेतकरी श्री किरण साबळे यांनी आपल्या शेतात
विद्यापीठ विकसित तुरीचे वाण बीडीएन-७११ याची यावर्षी एका एकरात लागवड केली होती.
त्यांना एकरी तेरा क्विंटल उत्पादन काढल्याची माहिती विभागीय कृषी विस्तार शिक्षण
केंद्रातील श्री रामेश्वर ठोंबरे यांना नुकतीच दिली. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठातील बदनापुर येथील कृषी संशोधन केंद्र निर्मित तूर वाण शेतकऱ्यांना पसंद
पडला आहे. श्री किरण साबळे यांना औरंगाबाद येथील विस्तार कृषी विद्यावेत्ता
कार्यालयाचे प्रभारी अधिकारी डॉ सूर्यकांत पवार यांच्याकडून बियाणे लागवडीपासून ते
पीक काढणीपर्यंतची तांत्रिक मार्गदर्शन केले, याचा उपयोग अधिक
उत्पादन काढण्यासाठी मिळाल्याची माहिती श्री साबळे यांनी दिली.
औरंगाबाद जिल्ह्यात बराच ठिकाणी तूर
वाण बिडीएन-७११ या वाणाचे खळे झाले आहे, विविध खेड्यातून शेतकरी फोन करून उत्पादनाबाबत माहिती कळत
आहे. पैठण तालुक्यातील लोहगाव येथील श्री मोहन डांगे यांना त्यांच्या एका हेक्टर
मधून सत्तावीस क्विंटल उत्पादन मिळाले असल्याचे तर मौजे रांजणगाव खुरी ता पैठण
येथील शेतकरी श्री भारत लघाणे यांना तीन एकर मधून तीस क्विंटल उत्पादन मिळाले असल्याचे
कळविले आहे. तसेच मौजे गले बोरगाव (ता खुलताबाद) येथील श्री तुळशीराम औटे यांना सव्वा एकर क्षेत्रामधून
बिडीएन-७११ या वाणाचे तेरा क्विंटल उत्पादन मिळाल्याचे सांगितले आहे. तूर वाण, आणि लागवड व्यवस्थापन आदी बाबी याविषयी कृषीशास्रज्ञाचे मार्गदर्शन वेळोवेळी
मिळाल्याने आमच्या उत्पादनात वाढ झाली असल्याचे सर्वांनी आवर्जून सांगितले.
सौजन्य : श्री रामेश्वर ठोंबरे, विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र, औरंगाबाद