Tuesday, January 17, 2023

आंतरराष्‍ट्रीय परिषदेत लातूर येथील शेतकरी श्री अशोक चिंते आणि श्री संजय नाडे यांचा गौरव

सन्‍मान शेतकरी बांधवाचा, सन्‍मान परभणी कृषी विद्यापीठाचा

हैद्राबाद येथील भारतीय तेलबीया संशोधन संस्‍थेच्‍या वतीने दिनांक १७ ते २१ जानेवारी दरम्‍यान वनस्‍पती तेल याविषयावर आंतरराष्‍ट्रीय परिषदेचे आयोजन करण्‍यात आले होते. यात देश-विदेशातील शास्‍त्रज्ञांचा सहभाग नोंदविला होता. सदर परिषदेत लातूर जिल्‍हयातील तेलबीया पिक उत्‍पादक शेतकरी मौजे मुरूड येथील श्री संजय नाडे आणि जवस उत्‍पादक शेतकरी मौजे चौर येथील श्री अशोक चिंते यांना पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आले. यावेळी भारतीय तेलबीया संशोधन केंद्राचे महासचिव डॉ सतिश कुमारपरिषदेचे आयोजन अध्‍यक्ष डॉ संजीव गुप्‍ताकार्यकारी अध्‍यक्ष डॉ आर के माथुरआयोजन सचिव डॉ एम सुजाथा आदींची प्रमुख उपस्थिती होती.

श्री चिंते आणि श्री नाडे हे गेल्‍या ३ ते ४ वर्षापासुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या लातूर येथुन प्रसारित झालेले जवसाचे वाण एलएसएस-९३ यांची लागवड करून चांगले उत्‍पादन घेत आहेत. श्री चिंते गेल्‍या ३ ते ४ वर्षापासुन जवसाची लागवड करित असुन केवळ ९० दिवसात येणा-या एलएसएस-९३ वाणापासुन त्‍यांना चांगला आर्थिक लाभ झालाते इतरही शेतक-यांना जवस लागवडीबाबत मार्गदर्शन करतात. गेल्‍या वर्षी त्‍यांनी जवसाचे हेक्‍टरी १७.५ क्विंटलचे उत्‍पादन घेतले. तर श्री संजय नाडे हे गेल्‍या ३ वर्षापासुन विद्यापीठ विकसित करडई पिकाचे वाण पीबीएनएस-१२ आणि जवसाची एलएसएल-९३ या तेलवर्गीय पिकांची लागवड करतातकरडई पासुन त्‍यांनी हेक्‍टरी २५ क्विंटल तसेच ऊस पिकांत जवसाचे आंतर पिक पध्‍दतीतुन १० क्विंटल चांगले उत्‍पादन घेतले आहे. ते करडई पिकांची लागवड पासुन काढणीपर्यतंची संपुर्ण कामे यांत्रिकीकरणाच्या माध्‍यमातुन करतात. या शेतकरी बांधवांना लातूर येथील तेलबिया संशोधन केंद्राचे शास्‍त्रज्ञ डॉ एम के घोडके आणि त्‍यांचे सहकारी हे वेळोवेळी मार्गदर्शन करतात.

या सन्‍मानाबाबत विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि व संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी त्‍यांचे अभिनंदन केले. सन्‍मानाबाबत कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि म्‍हणाले कीमराठवाडा विभागात तेलबिया पिकांचे लागवड क्षेत्राचे प्रमाण घट होत असतांना श्री अशोक चिंते आणि श्री संजय नाडे यांनी घालुन दिलेला आदर्श इतर शेतकरी बांधवाना प्रेरणादायी ठरेल. तर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर म्‍हणाले कीअनेक शेतकरी विद्यापीठ विकसित वाण व तंत्रज्ञानाचा अवलंब करून चांगले उत्‍पादन घेतातयासारख्‍या प्रगतशील शेतकरी बांधवांचा विद्यापीठ संशोधनात योगदान घेण्‍यात येणार असुन तेलबिया लागवडीखालील क्षेत्र वाढी करिता प्रयत्‍न केला जात आहे.