Wednesday, January 11, 2023

हार्टफुल अॅग्रो युथ समिट करिता वनामकृविचा संघ रवाना

भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली आणि हार्टफुल कॅम्पस यांच्या सामंजस्य करार अन्वये दिनांक १२ जानेवारी ते १४ जानेवारी दरम्यान “हार्टफुल अॅग्रो युथ समिट” चे आयोजन कान्हा शांतीवनम हैद्राबाद येथे करण्‍यात आले असुन सदर कार्यक्रमाकरिता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापिठाच्‍या विद्यार्थ्‍यांचा संघ दिनांक ११ जानेवारी रवाना झाला आहे. सदर कार्यक्रमासाठी देशातील साधारणात: ७५ कृषि व संलग्न विद्यापीठातील विद्यार्थी सहभाग नोंदविणार आहेत. विद्यापीठाच्‍या संघात निवडक १४ मुली व २८ मुले यांचा समावेश असुन सदर युथ समिट मध्‍ये विद्यार्थीच्‍या सर्वांगिन विकासाकरिता विविध उपक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे. यात उद्योग जगातील मान्यवर यांच्याशी संवाद साधणार आहेत. कृषि क्षेत्रात होणा­या तंत्रज्ञानाच्या नवीन बदलावर चर्चा करणार आहेत. विद्यार्थ्‍यांचे शारिरीक आणि मानसिक संतुलन साधण्यासाठी योगा, खेळ व ज्ञानसाधना या कार्यक्रमावर अधिक भर यात राहणार असुन कृषी पद्धती, शेती, पृथ्वी असलेले मानवाचे नाते आणि निसर्ग मानवाकरिता देत असलेले दान याची जाणीव आजच्‍या तरूण पिढीमध्‍ये निर्माण करणे आणि भारतातील शेती इतर व्यवसायापेक्षा श्रेष्‍ठ आहे, ती एक भावना तरूणांमध्‍ये निर्माण करणे, हा उद्देश्‍य  हार्टफुल अॅग्रो यूथ समिट आहे. विद्यापीठाच्‍या संघाकरिता सहयोगी प्राध्‍यापक डॉ. एस. एल. बडगुजर व हार्टफुल कॅम्पसचे साधक श्री. जोशी हे मार्गदर्शक म्हणून लाभले आहे. सदर संघास कुलगुरु मा डॉ. इन्द्र मणि, संचालक शिक्षण डॉ. धर्मराज गोखले, कुलसचिव डॉ. धिरजकुमार कदम, नियंत्रक डॉ. दिपाराणी देवतराज, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सचिन मोरे आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत. दिनांक १६ ते १९  नोंव्‍हबर दरम्‍यान वनामकृवि, परभणी येथे राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेनाच्या विद्यार्थ्‍यांसाठी चार दिवसीय “स्टार्टअप कार्यक्रम” घेतण्‍यात आला होता.