Sunday, June 28, 2020

वनामकृवित डिजिटल साधनाच्‍या माध्‍यमातुन पिकांच्या अजैविक ताण व्‍यवस्‍थापन यावरील आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणाचे आयोजन

प्रशिक्षणात आंतरराष्‍ट्रीय र्कीतीचे संशोधक करणार मार्गदर्शन तर ४० आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणार्थीसह देशातील ४५० प्रशिक्षणार्थीचा सहभाग

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आाणि जागतिक बॅक पुरस्‍कृत राष्ट्रीय कृषी उच्चशिक्षण प्रकल्प (नाहेप), भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने २९ जुन ते ३ जुलै दरम्‍यान डिजिटल साधनाच्‍या माध्‍यमातुन पिकांच्या अजैविक ताण व्‍यवस्‍थापन या विषया वरील आंतरराष्ट्रीय ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आले असुन प्रशिक्षणाचे उदघाटन २९ जुन रोजी सकाळी ११.०० वाजता होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण राहणार असुन प्रमुख पाहुणे म्हणुन धारवाड (कर्नाटक) येथील कृषी विज्ञान विद्यापीठ कुलगुरु मा. डॉ. एम. बी. चेटटी, ऑस्ट्रेलिया येथील युनीव्हर्सीटी ऑफ वेस्टर्नचे संचालक मा. प्रा. कदमबोट सिद्यीकी, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले आदींची उपस्थिती लाभणार आहेत. 

सदरील ऑनलाईन प्रशिक्षणात सहभागी कृषी वनस्पती शरीरक्रिया शास्त्राशी निगडीत संशोधक, प्राध्यापक व आचार्य विद्यार्थी यांना जागतिक हवामान बदलाला अनुसरुन विविध पिकांचे नवीन वाणांची निर्मिती व संशोधन करतांना पिकांची शरीरक्रियाशास्त्र समजुन घेऊन होणा-यां बदलाची आधुनिक डिजीटल साधनांची ओळख, व संशोधनात त्यांचा अंतर्भाव आदींबाबत देश - विदेशातील शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. यात ऑस्ट्रेलिया येथील वेस्टर्न युनीव्हर्सीटीचे संचालक प्रा. कदमबोट सिद्यीकी, अमेरीका येथील कान्स स्टेट युनीव्हर्सीटीचे डॉ. पी. व्ही. वरप्रसाद, अमेरिकास्थित भारतीय कृषि अनुसंधान परिषदे माजी विभाग प्रमुख डॉ पी. एस. देशमुख, केरळ येथील सीपीसीआरआयचे निवृत्त संचालक डॉ. वेलामुर राजगोपाल, आयसीएआरतील वनस्पती शरीरक्रीया शास्त्राचे विभाग प्रमुख डॉ. व्ही. चीन्नुस्वामी, आनुवंशिकी विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सी. भारव्दाज, हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहु शेती संशोधन संस्थेचे डॉ. एम. माहेश्वरी, युनिव्हरसीटी ऑफ इलीनीऑस (अमेरीका) चे शास्‍त्रज्ञ डॉ. नितीन कदम, डॉ. पुसा (बिहार) येथील राजेंद्र प्रसाद केंद्रीय कृषी विद्यापिठाचे डॉ राजीव बहुगुना, जपान येथील वरिष्ठ संशोधक डॉ. व्ही. देशमुख आदींचा समावेश आहे.

प्रशिक्षणाकरिता देश विदेशातुन दिड हजार पेक्षा जास्‍त अर्ज प्राप्त झाले असुन यातुन ४९० प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात आली आहे, यात अमेरिका, जपान, ब्राझील, नेपाळ, पाकिस्‍तान, इस्त्राईल, फिलिपीन्स, पोर्तुगाल, अफगाणिस्तान, घाना, केनिया, नायजेरिया आदीसह ४० आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणार्थीचा सहभागी आहे. प्रशिक्षणाचे आयोजन नाहेप प्रकल्‍पाचे प्रमुख अन्वेषक डॉ. गोपाळ शिंदे, विभाग प्रमुख (विस्‍तार शिक्षण) तथा प्रकल्‍प उपअन्वेषक डॉ. राजेश कदम, सहयोगी संचालक (बियाणे) डॉ. के. एस. बेग, आयोजन सचिव डॉ. गोदावरी पवार आदींनी केले आहे.