वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठातील पशुशक्तीचा योग्य वापर योजने वतीने दिनांक 26 जुन रोजी शास्त्रज्ञ व शेतकयांकरिता झुम अॅप क्लाउड मिटींग व्दारे एक दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. सदरिल प्रशिक्षणात शेतकयांना सेंद्रीय शेती व्यवस्थापन या विषयावर प्रमुख
अन्वेषक डॉ. आनंद गोरे यांनी तर सौरउर्जेचा वापर व गोबरगॅस तंत्रज्ञान यावर डॉ. राहुल रामटेके यांनी मार्गदर्शन केले.
मार्गदर्शनात डॉ. आनंद गोरे यांनी सेंद्रीय शेती सेंद्रीय शेती व्यवस्थापनात शेतकयांनी टप्याटप्याने मार्गक्रमन करावे, सेंद्रीय शेतीसाठी लागणाया निविष्ठा स्वत: तयार कराव्यात.
सेंद्रीय प्रमाणीकरणासाठी सर्व शेती कामे व निविष्ठा यांच्या योग्य नोंदी घ्याव्यात, असे सांगितले तर डॉ. राहुल रामटेके यांनी सौर
उर्जेचा वापर आज सर्वच क्षेत्रात मोठया प्रमाणावर वाढला आहे, शेती क्षेत्रात शेतकरी विविधि कामांसाठी सौर
उर्जेचा वापर करुन योग्य वेळी शेती कामे करु शकतात याचा शेतकयांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
प्रश्नोत्तर कार्यक्रमात गोवींद देशमुख, श्री. गोवर्धन शर्मा इटोलीकर, प्रताप काळे, साहेब पुंडकरे, सुमंत मानकर आदी शेतकरी बांधवानी विचारलेल्या कृषि
तंत्रज्ञान विषयक प्रश्नांना शास्त्रज्ञांना उत्तरे दिली.
कार्यक्रमाची प्रस्तावना प्रशिक्षणाचे आयोजक पशुशक्तीचा योग्य वापर योजनाच्या प्रभारी अधिकारी डॉ. स्मिता सोळंकी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेकरिता श्री. अजय वाघमारे, नांदेड केव्हीकेचे डॉ. देविकांत देशमुख, कर्डा केव्हीकेचे रविंद्र काळे, डॉ. सुनिल जावळे, श्री. सतिश कटारे आदींनी परिश्रम घेतले. प्रशिक्षणात मराठवाडयातील 90 पेक्षा जास्त शेतकयांनी सहभाग नोंदविला.