Sunday, June 21, 2020

कापुस व सोयाबीन पीक व्यवस्थापनावर ऑनलाईन मार्गदर्शन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व रिलायन्स फाऊंडेशन यांच्या संयक्त विद्यमाने परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवाकरिता दिनांक 19 जुन रोजी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर ऑडिओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. यंदा वेळेवर पाऊस पडलेला असुन सध्या खरीप हंगाम पेरणीला सुरुवात झालेली आहे. सद्या कोरोना रोगाच्‍या प्रादुर्भाव परिस्थितित शेतकऱ्यांना अधिकाधिक तांत्रिक माहिती मिळावी या उद्देशाने विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ डी बी देवसरकर व विस्तार कृषी विध्यावेत्ता डॉ यु एन आळसे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. यात सोयबीन, कपाशी, तूर इत्यादी पिकांचे नियोजन कसे असावे याबद्दल माहिती देण्यात आली. बीज प्रक्रिया, बीज निवड, खत व्यवस्थापन, पीक संरक्षण या विषयी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

मार्गदर्शन करतांना यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले कि, शेतक-यांनी उत्‍पादन वाढीच्‍या द्ष्‍टीने विविध पिकांच्‍या चांगल्‍या वाणांची निवड करावी, पेरणी पुर्वीच उगवणशक्ती तपासुन घ्‍यावी, तसेच बीज प्रक्रिया, खताचे नियोजन शिफारशीत मात्रेत करायला पाहिजे, असे सांगुन करोंना विषाणू परिस्थितीत  शेतकऱ्यांनी शेतीची कामे करत असतांना सामाजिक अंतर जोपासण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला. विस्तार कृषी विध्यावेत्ता डॉ यु एन आळसे यांनी  बीज प्रक्रिया, बीज निवड, घरघुती बियाण्याचा वापर, नवीन संशोधित वाण, खत व पाणी व्यवस्थापन, पीक संरक्षण आदीबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात शेतकरी बांधवांनी आपल्या घरातच बसून फोनद्वारे खरीप पूर्व नियोजन ,जमीन मशागत,  हुमणी नियंत्रणाचे उपाय, बीज प्रक्रिया याबाबत प्रश्न विचारले. या कॉन्फरन्स मध्ये जिल्ह्यातील मोठया संख्‍येने शेतकरी बांधवांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे आयोजन रिलायन्स फोन्डेशन परभणी जिल्हा व्यवस्थापक विलास सवाणे यांनी केले तर कार्यक्रम सहाय्यक रामाजी राऊत यांनी केले.