Monday, July 6, 2020

शेतमाल डिजिटल मार्केटिंगद्वारे थेट ग्राहकांना ऑनलाइन विक्री करा ..... कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

वनामकृविच्‍या वतीने आयोजित डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शेतकरी महिलांची आत्‍मनिर्भरता या विषयावर राज्यस्तरीय वेबिनारचे उदघाटन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली आणि जागतिक बँक पुरस्‍कृत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप), सेंटर ऑफ एक्सलन्स उत्पादकता वाढीकरता यंत्रमानव, ड्रोन आणि स्वयंचलित यंत्राद्वारे शेती प्रकल्पाच्‍या वतीने डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शेतकरी महिलांची आत्‍मनिर्भरता या विषयावर दि. 6 ते 10 जुलै दरम्‍यान राज्यस्तरीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले असुन वेबीनारचे उदघाटन कार्यक्रम दिनांक 6 जुलै रोजी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या अध्‍यक्षतेखाली पार पडलाप्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील अटरी संस्‍थेचे  संचालक डॉ. लखनसिंग, प्रमुख व्‍यक्‍त्‍या म्‍हणुन पद्मश्री बीजमाता सौ. राही बाई पोपेरे, दौंड येथील अंबिका मसालेच्‍या  संचालिका सौ. कमलताई परदेशी, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, सामुदायिक विज्ञान डॉक्टर जयश्री झेंड,  प्रकल्‍प प्रमुख डॉ गोपाल शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, शेतकरी महिलांची आत्‍मनिर्भरतावर आधारित नाविन्यपूर्ण वेबिनारचे आयोजन निश्चितच कौतुकास्‍पद आहे. शेतकरी महिलांचे काबाडकष्ट कमी करून त्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी विद्यापीठ प्रयत्‍नशील असुन सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्‍या कृषी अभियांत्रिकी व अन्नतंत्रज्ञान विभागाने अनेक शेतकरी महिलांना उपयुक्‍त तंत्रज्ञान विकसित केले आहे. भाजीपालाव अन्नधान्य यावर केलेल्या साध्या सोप्या प्रक्रियांद्वारे व्यवस्थित व आकर्षक पॅकिंग करून मालाची विक्री करावी. शेतकरी महिला व शेतकऱ्यांनी शेतमाल उत्पादन डिजिटल ऑनलाइन मार्केटिंगद्वारे थेट ग्राहकांना विक्री करावे जेणेकरून आर्थिक लाभ वाढू शकेल. कुटीर उद्योग व शेतीपुरक व्‍यवसायात शेतकरी महिलांन संधी शोधून आत्मनिर्भर व्हावे, असे मत व्यक्त केले

प्रमुख व्‍यक्‍त्‍या बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे आपली यशोगात कथन करतांना म्‍हणाल्‍या की, पिकांच्‍या अनेक देशी वाण हे मानवास आरोग्‍यदायी असुन शेतकरी महिला, प्रगतिशील शेतकरी यांनी आपल्‍या स्तरावर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यात नैसर्गिकरित्यादेशी बियाणे जतन करावे. शेतीतील अतिरेकी रासायनिक खतांचा व किटकनाशकांच्‍या वापरामुळे अनेक आजार होतांना दिसत आहेत. यामुळे सेंद्रिय शेतीकडे वळावे, नैसर्गिकरित्या पिकवलेला भाजीपाला अन्नधान्य उत्‍पादन करावे, असे त्‍या म्‍हणाल्‍या.

महिला उद्योजिका सौ कमलताई परदेशी यांनी शून्यातून सुरुवात करू आज करोडोची ऊलाढाल असलेल्‍या अंबिका मसाला उद्योग यशस्‍वीपणे सांभाळत आहेत, त्‍यांनी आपली अत्यंत प्रेरक यशोगाथा विशद करून  महिलांना उद्योग व्यवसाय करतानां येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी केलेल्या उपाययोजना व  क्लुप्त्या यांनी माहिती दिली.  

अटारीचे संचालक डॉ लखन सिंग यांनी सहभागी शेतकरी महिलांना विविध कृषी उद्योग व्यवसाय मार्केटिंग याद्वारे सक्षम होण्यासाठी उद्यमी महिलांची उदाहरणे देऊन प्रवृत्त केले. अत्यंत उपयुक्त अशा वेबिनारच्या आयोजनाबद्दल विद्यापीठाचे धन्यवाद मानले मानले.

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक आयोजन उपसचिव डॉ गोदावरी पवार यांनी केले तर डॉ गोपाळ शिंदे नाहेप प्रकल्‍पाबाबत माहिती दिली. सुत्रसंचालन वेबिनार आयोजन सचिव डॉ विना भालेराव यांनी केले तर आभार डॉ मेघा जगताप यांनी मानलेकार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ अविनाश काकडे, डॉ रश्मी, डॉ अपूर्वा यांनी विशेष परिश्रम घेतले. ऑनलाईन वेबिनार मध्‍ये दिडशे पेक्षा जास्‍त महिला सहभागी झाल्‍या होत्‍या.