मौजे हिंगळजवाडी (जि उस्मानाबाद) येथे आयोजित महिला मेळाव्यात मार्गदर्शन
माजी मुख्यमंत्री
तथा हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या वतीने कृषि संजीवनी सप्ताहाचे आयोजन करण्यात
आले असुन दिनांक 2 जुलै रोजी उस्मानाबाद येथील कृषि महाविद्यालय व कृषि विभाग यांचे संयुक्त विद्यमाने मौजे हिंगळजवाडी महिला शेती शाळेचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याच्या
अध्यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण हे होते, तर प्राचार्य डॉ राकेश अहिरे, तालुका कृषि अधिकारी ज्ञानेश्वर जाधव, तुळजापुर कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ
सचिन सुर्यवंशी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात
कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्हणाले की, ग्रामीण भागातील महिला शेतक-यांनी कुटुंबाची
आर्थिक परिस्थिती सुधारण्याकरिता बचत गट स्थापन करून शेती पुरक व्यवसाय सुरू
करावा. महिलांनी आपल्या परसबागेत विषमुक्त भाजीपाला पिकवावा. महिलांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचा वापर कृषि
क्षेत्रात करावा असे आवाहन केले.
कृषि सहाय्यक वैभव लेणेकर यांनी महिला शेती शाळेची माहिती दिली तर डॉ आरबाड यांनी सोयाबीन लागवड तंत्रज्ञानावर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक कृषि सहाय्यक श्री देशमुख यांनी केले. सुत्रसंचालन डॉ प्रविण चव्हाण यांनी केले तर आभार डॉ किरण थोरात यांनी मानले. कार्यक्रमास महिला शेतकरी, कृषि महाविद्यालया व कृषि विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या वेळेस कोरोना विषाणु रोगाच्या पार्श्वभुमीवर सर्व प्रतिबंधात्मक दक्षता घेण्यात आली होती.