Thursday, July 2, 2020

माजी मुख्‍यमंत्री तथा हरितक्रांतीचे प्रणेते स्‍व. वसंतराव नाईक यांच्‍या तैलचित्राचे अनावरण

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात महाराष्‍ट्राचे माजी मुख्‍यमंत्री तथा हरितक्रांतीचे प्रणेते स्‍व. वसंतराव नाईक यांची जयंती दिनांक १ जुलै रोजी कृषिदिनानिमित्‍त विद्यापीठाच्‍या प्रशासकीय इमारतीमध्‍ये स्‍व.  वसंतराव नाईक यांच्‍या तैलचित्राचे अनावरण कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. याप्रसंगी शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव श्री रणजित पाटील, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, विद्यापीठ नियंत्रक श्री एन एस राठोड, आदीं उपस्थित होते. सदरिल तैलचित्र विद्यापीठाचे कलाकार श्री अमोल सोनकांबळे यांनी तयार केले आहे.