Monday, July 6, 2020

रेशीम उद्योगातुन आत्मनिर्भरतेकडे या विषयीवर वेबिनार संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील पशुशकतीचा योग्य वापर व रेशीम संशोधन योजना यांच्या सयुक्त विद्यमाने दिनांक 27 जुन रोजी शेतकरी, विद्यार्थी व शास्त्रज्ञ यांच्यासाठी एक दिवसीय प्रशिक्षण  वेबिनारचे रेशीम उद्योग एक पाऊल आत्मनिर्भरतेकडेयाविषयीवर संपन्‍न झाला. प्रशिक्षणात रेशीम किटकाचा जीवनक्रम, निर्जतुकीकरण, रेशीम कोष निर्मीती आणि काढणी तंत्रज्ञान या विषयीवर प्रभारी अधिकारी डॉ. सी. बी.लटपटे यांनी मार्गदर्शन केले. डॉ. राहूल रामटेके यांनी रेशीम उद्योगामध्ये सौर उर्जेचा वापरयाविषयी तर डॉ. स्मिता सोळंकी यांनी तुती लागवडीमध्ये यांत्रीकीकरणया विषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास राज्यातील यतमाळ जिल्हा रेशीम विकास अधिकारी श्री. पी.एम.चौगुले, अमरावती जिल्हा श्री. संजय पांढरे, रेशीमरत्न श्री.सोपानराव शिंदे, रोहित शिंदे, एम.डी.देसाई चुडावा ता.पुर्णा, अजय कुलकर्णी, अपर्णा भालेराव, सुलोचना बोंढे, दिपक, राहुल बाबर, विश्वनाथ दहे, नितीन पवार, शिवकुमार, महेश कडासने, अशोक खुपसे आदीसह 130 जणांनी सहभाग नोंदवला.