Saturday, December 10, 2022

कृषी आणि जैवप्रणाली अभियांत्रिकी आंतरराष्ट्रीय अकादमीचे फेलो म्‍हणुन माननीय कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांची निवड

जपान येथे आयोजित आंतरराष्‍ट्रीय परिषदेत करण्‍यात आले सन्‍माननित

अमेरिकेतील फ्लोरिडो विद्यापीठात मुख्‍यालय असलेल्‍या कृषी आणि जैवप्रणाली अभियांत्रिकी आंतरराष्ट्रीय अकादमी (iAABE – International Academy of Agricultural and Biosystem Engineering) या अग्रगण्‍य वैज्ञानिक संस्‍थेचे फेलो म्‍हणुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांची निवड करण्‍यात आली असुन जपान मधील क्‍योटो येथे दिनांक ५ ते ९ डिसेंबर २०२२ दरम्यान आयोजित विसावी सीआयजीआर जागतिक परिषदेत त्‍यांना फेलो म्‍हणुन अकादमीचे अध्‍यक्ष मा डॉ फेड्रो एस. झाझुएटा यांच्‍या हस्‍ते सन्‍माननित करण्‍यात आले. मा. डॉ. इन्‍द्र मणि यांचे कृषी अभियांत्रिकी क्षेत्रातील तसेच देशातील कृषि संस्थांमध्ये काम करतांना सर्वांगीण कृषी विकासात दिलेल्‍या योगदानाच्‍या पार्श्‍वभुमीवर त्‍यांची फेलो म्‍हणुन निवड करण्‍यात आली. 

सदर परिषदेचा ‘शाश्वत कृषी उत्पादन – पाणी, जमीन, ऊर्जा आणि अन्न’ असा मुख्‍य विषय होता, यात जागतिक पातळीवर कृषि आणि जैवप्रणाली अभियांत्रिकी क्षेत्राशी संबंधित संशोधक, अभियंते, प्राध्‍यापक, उद्योजक आणि विद्यार्थी, जागतिक तज्ञ यांनी सहभाग घेऊन त्यांचे संशोधन निष्कर्षाचे सादरिकरण केले. सदर परिषदेत देशातील कृषी विद्यापीठामधुन एकमेव मुख्‍य वक्‍ता म्‍हणुन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांना विशेष आमंत्रित करण्‍यात आले होते, परिषदेत त्‍यांनी ‘शाश्वत अन्न-पाणी-ऊर्जा संबंध-भारतीय संदर्भ’ या विषयावर व्‍याख्‍यान दिले. परिषदेतील निष्कर्ष मराठवाडा विभाग आणि महाराष्ट्र राज्यात शाश्वत कृषी उत्पादनासाठी उपयुक्त ठरतील, असे मत मा डॉ इन्‍द्र मणि यांनी व्‍यक्‍त केले. परिषदेत उपस्थित विविध आंतरराष्‍ट्रीय संस्थेतील संशोधक व प्राध्‍यापकांशी मा डॉ इन्‍द्र मणि यांनी संशोधनात्‍मक भागीदारी बाबत चर्चा केली.

कृषी क्षेत्रात स्‍वयंचलित यंत्रे, यंत्रमानव तंत्रज्ञान (रोबोटिक्स) आणि ड्रोन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जपान आघाडीवर असुन हे तंत्रज्ञान भारतामध्ये प्राथमिक अवस्थेत आहेत. मा डॉ इन्‍द्र मणि हे राष्ट्रीय स्तरावरील केंद्र शासनाच्‍या ड्रोन समितीचे अध्यक्ष असुन नुकतेच समितीने कृषी क्षेत्रात ड्रोनच्या वापरासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. ड्रोन तंत्रज्ञान हे कृषी क्षेत्रातील उदयोन्मुख तंत्रज्ञान असुन हे तंत्रज्ञान कीटकनाशक फवारणी, पीक निरीक्षण, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन, शेत मोजणी, पिक नुकसानीचा अंदाज इत्यादीसाठी उपयुक्त ठरणार आहे. जपानमध्ये विकसित अत्याधुनिक आणि आवश्यक तंत्रावर संशोधन करून भारतीय परिस्थितीत आणि विशेषतः महाराष्ट्रासाठी शेतीकरिता उपयुक्त ठरू शकते. शाश्वत कृषी विकासासाठी काम करणाऱ्या जगातील नामांकित संस्थांसोबत विद्यापीठाचे संबंध भविष्‍यात मजबूत करण्याचा प्रयत्‍न केला जाणार आहे. कृषी आणि स्‍वयंचलित तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनात जपानी संशोधक भारतासोबत सहकार्य करण्यास इच्छुक आहेत. अशा सहकार्यामुळे जपानी विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिपची सुविधा निर्माण होईल, जी भारतासाठी प्रगत कृषी यंत्रसामग्रीच्या क्षेत्रात कुशल मानव संसाधन विकसित करण्यास मदत होऊ शकते. भारतीय विद्यार्थ्यांना जपानी संस्थांमध्ये संशोधन कार्य करण्याची संधी असल्‍याचे मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले. भारतीय कृषी क्षेत्रातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी भविष्‍यात सहयोगी प्रकल्पही हाती घेतले जाऊ शकतात. परिषदेत पशुसंवर्धन, फलोत्पादन आणि काढणी पश्‍चात तंत्रज्ञानामध्ये स्‍वयंचलितकरण (ऑटोमेशन) चा वापर याविषयांवर सविस्‍तर चर्चा करण्‍यात आली.



VNMAU’s Vice-Chancellor Dr Indra Mani addressed CIGR World Congress held at Japan as Distinguished Guest Speaker

 

Dr. Indra Mani conferred with prestigious fellowship of iAABE, USA during the Congress

 

Dr. Indra Mani, Hon’ble Vice-Chancellor of Vasantrao Naik Marathwada Agricultural University (VNMAU), Parbhani addressed XX CIGR World Congress as a Distinguished Guest Speaker specially invited by CIGR International Commission of Agricultural and Biosystems Engineering, where he delivered a lecture on "Sustainable Food-Water-Energy Nexus: India Context." 

The said congress was held at Kyoto, Japan during December 5-9, 2022 on theme 'Sustainable Agricultural Production - Water, Land, Energy and Food', in which researchers, engineers, professors, entrepreneurs and students, experts related to the field of agriculture and bio-systems engineering at the global level participated and presented their research findings. The congress focused on different scientific and technical areas of Agricultural Engineering through various sessions such as land and water, structures and environment, plant production, energy in agriculture, system management, bioprocesses, and information technology etc. Dr. Indra Mani expressed that the findings of the conference will be useful for sustainable agricultural production in the Country, Maharashtra state and Marathwada region. 

The outcomes of the said congress are very fruitful, the delegates around the globe discussed about the latest agricultural technologies. During the Congress, Dr. Indra Mani interacted with various international scientists and distinguished professors on collaborative research work which can be taken up in the future to address the issues facing the Indian agriculture sector. 

The research findings regarding digital farming were also discussed in the Congress. The ideas and outcomes coming from the Congress are inputs for strengthening and expediting the activities of digital farming research. The relevant cutting edge and needful techniques developed in Japan can be promoted which are suitable to Indian context. It will strengthen the network of the university with reputed institutes of the world who are working in the sustainable agricultural development. Most of the Japanese scientists and professors are now willing to have a research collaboration with India in agriculture and automation areas. This collaboration will create a possibility to have an internship for our students at Japanese Universities which will help in making skilled human resources for India in advanced farm machinery. On other hand, institutes from Japan will get the students for research from our country, said Dr. Indra Mani.

The Japan is the one of the leading countries in area of automation, robotics and drone technology in agriculture. Drone technology is the emerging technology in the agricultural field which is useful in insecticide and pesticide spraying, crop monitoring, field measurement etc. These technologies are in infant stage in India. Dr. Indra Mani is a chairman of the national level drone committee of Central government to formulate the guidelines for use of drones in agriculture.

In the said congress, Dr. Indra Mani conferred with the prestigious fellowship of the International Academy of Agricultural and Biosystem Engineering (iAABE), a prominent scientific organization having its headquarter at University of Florida, USA. Dr. Indra Mani has been elected as a fellow of the iAABE for his outstanding contributions in the field of agricultural engineering as well as overall agricultural development during his working in agricultural institutions in the country.