Monday, December 5, 2022

वनामकृवित आंतरराष्‍ट्रीय मृदा दिनानिमित्‍त आयोजित सप्ताहाची सांगता

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभाग आणि भारतीय मृद विज्ञान संस्था, नवी दिल्ली, शाखा परभणी यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय मृदा दिनानिमीत्त दिनांक २९ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर दरम्‍यान मृदा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहाचे उद्घाटन कुलगुरू मा. डॉ. इन्‍द्र मणि यांच्या हस्ते करण्यात आले. तर दिनांक ५ डिसेंबर रोजी समारोपीय कार्यक्रम संपन्‍न झाला. मृदा सप्ताहाचा समारोपीय कार्यक्रम परभणी कृषी महाविद्याीयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. सय्यद इस्माईल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला तर कार्यक्रमास सहयोगी अधिष्ठाता डॉ. यु.एम. खोडके यांची प्रमुख उपस्थिती होती. व्‍यासपीठावर आयोजक डॉ प्रविण वैद्य, डॉ सुरेश वाईकर, डॉ महेश देशमुख आदींची उपस्थिती होती.

मार्गदर्शनात डॉ. सय्यद इस्माईल म्‍हणाले की, मातीच्या रासायनिक, भौतिक व जैविक घटकांचे परिपुर्ण संरक्षण करुन पुढील पिढीस शाश्‍वत शेतीसाठी हस्तातंरीत करण्‍यासाठी सर्वांनी प्रयत्‍न करण्‍याची गरज आहे.  तर डॉ. यु.एम. खोडके म्‍हणाले की, मृद आरोग्य पत्रिकेत मातीच्या रासायनीक गुणधर्मांसोबतच भौतिक आणि जैविक गुणधर्मांचा समावेश असणे गरजेचे आहे. प्रास्ताविकात विभाग प्रमुख डॉ. प्रविण वैद्य यांनी आंतरराष्ट्रीय मृदा दिनाचे महत्व विषद करून मृदा सप्ताह निमित्त आयोजीत कार्यक्रमांची माहिती दिली. जमिनीची सुपिकता टिकविण्यासाठी माती परीक्षणावर आधारीत समतोल अन्नद्रव्यांचा वापर करण्याचे अवाहन केले.

सप्ताह निमित्‍त शेतकरी व विद्यार्थी यांच्‍या मध्‍ये मृदा आरोग्‍यावर जनजागृती करण्‍यात आली. यात मृदा आरोग्‍यावर विद्यार्थ्‍यांकरिता प्रश्नमंजुषा, भित्तीपत्रक स्पर्धा घेण्‍यात आली तर मौजे लोहगाव येथे मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभाग, भारतीय मृद विज्ञान संस्था, नवी दिल्ली, शाखा परभणी आणि स्मार्ट केम टेक्नॉलॉजीस ली. पुणे (महाधन) यांच्या संयुक्त विद्यामाने शेतकरी मेळाव्‍यात मार्गदर्शन करण्‍यात आले, यात १०० पेक्षा जास्‍त शेतकरी बांधवांनी सहभाग नोंदविला.

मृद सप्ताह निमीत्त आयोजीत प्रश्नमंजुषा स्पर्धेत गुडपती रामा लक्ष्मी हीने प्रथम तर निखील पाटील व रवि वर्मा या दोघांनी व्दितीय क्रमांक पटकावला तसेच भित्तीपत्रक स्पर्धेत प्रिया सत्वधर हिने प्रथम, प्रियंका घोडके हिने व्दितीय व रवि वर्मा याने तृतीय क्रमांक पटकावला. कार्यक्रमात मान्‍यवरांच्‍या हस्‍ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. मृदा सप्ताहाचे आयोजन विभाग प्रमुख डॉ. प्रविण वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिव डॉ. अनिल धमक, सहसचिव डॉ. पपिता गौरखेडे, डॉ. रामप्रसाद खंदारे, डॉ. महेश देशमुख, डॉ. सुरेश वाईकर, डॉ. भाग्यरेषा गजभीये, डॉ. सुदाम शिराळे, डॉ. स्वाती झाडे, डॉ. संतोष चिक्षे, डॉ. संतोष पिल्लेवाड, डॉ स्नेहल शिलेवंत, श्री भानुदास इंगोले, श्री आनंद नंदनवरे आदीसह विभागातील कर्मचारी, पदव्युत्तर व आर्चाय पदवी विद्याथ्यार्थी  यांनी परीश्रम घेतले.