Monday, December 5, 2022

महाराष्ट्र राष्‍ट्रीय छात्रसेना संचालनालयाच्या वतीने आयोजित सायकल महापरिक्रमा रॅली परभणीतुन मार्गस्‍थ

आझादीचा अमृत महोत्‍सवानिमित्‍त देशातील युवाशक्‍तीचा चालना देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राष्‍ट्रीय छात्रसेना संचालनालयाच्या वतीने सायकल महापरिक्रमा रॅलीचे दिनांक २४ नोव्‍हेबर ते २४ डिसेंबर आयोजन करण्‍यात आले असुन दिनांक ५ डिसेंबर रोजी सायकल रॅलीने परभणीतुन प्रस्‍थान केले. सदर रॅली जळगाव ते मुंबई असा २२०० किलोमीटरचा प्रवास करणार आहे. यात अमरावती एनसीसी ग्रुपचे तेरा सदस्‍य असुन लेफ्टनंट कर्नल सी पी भडोला यांच्‍या नेतृत्‍वाखाली एक सहाय्यक एनसीसी अधिकारी, सेना कर्मचारी व दहा छात्रसैनिकांचा समावेश आहे. दिनांक ४ डिसेंबर रोजी सायकल रॅली वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात दाखल झाली होती, यावेळी  लेफ्टनंट जयकुमार देशमुख, नायब सुभेदार लाल मोहम्मद  व छात्रसैनिकांनी त्यांचे स्वागत केले.  विद्यापीठात मुक्काम करून दिनांक ५ डिसेंबर रोजी सकाळी सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. सय्यद इस्माईल यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅली प्रवासासाठी मार्गस्थ झाली. रॅलीस माननीय कुलगुरू डॉ. इन्‍द्र मणि, संचालक शिक्षण डॉ. धर्मराज गोखले यांनी शुभेच्छा दिल्या. सदर रॅलीच्या व्यवस्थेसाठी वृषभ, वैभव, श्रीकृष्ण, अभय, अक्षय आदींनी  परिश्रम घेतले.