परभणी जिल्ह्रातील ग्रामीण युवकांकरीता महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत किमान कौशल्य विकास कार्यक्रम सन २०२२-२३ (सर्वसाधारण जिल्हास्तरीय योजना) परभणीच्या वतीने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अन्नतंत्र महाविद्यालयामध्ये स्क्वॅश आणि ज्युस प्रक्रिया तंत्रज्ञ २६० तास, मसाले प्रक्रिया तंत्रज्ञ ५२० तास आणि फ्रुट पल्प प्रक्रिया तंत्रज्ञ ३२० तास अभ्यासक्रम (कोर्सेस) सुरू करण्यात येत असून याकरीता नावनोंदणी चालू आहे.
याकरीता स्क्वॅश आणि ज्युस प्रक्रिया तंत्रज्ञ या कोर्ससाठी किमान आठवी पास आणि स्क्वॅश आणि ज्युस प्रक्रियेचा २ ते ३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. मसाले प्रक्रिया तंत्रज्ञ अभ्यासक्रमाकरीता किमान दहावी पास व ० ते १ वर्षाचा मसाले प्रक्रिया उद्योगाचा अनुभव असणे आवश्यक आहे आणि फ्रुट पल्प प्रक्रिया तंत्रज्ञ या कोर्ससाठी किमान आठवी पास व २ ते ३ वर्षाचा अन्न प्रक्रिया उद्योगाचा अनुभव असणे आवश्यक आहे. सदरील कोर्सेससाठी परभणी जिल्ह्रातील १८ ते ४५ वयोगटातील ग्रामीण युवक पात्र आहेत. सदर कोर्स करीता अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तरी अधिक माहितीकरीता सहाय्यक आयुक्त श्री प्रशांत खंदारे (9420788747), श्री दिक्षीत (9890828797) कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र किंवा अन्नतंत्र महाविद्यालय, वनामकृवि, परभणी येथील सहयोगी अधिष्ठाता प्रा.डॉ.आर.बी.क्षीरसागर (9834905580), प्रा. श्रीमती.ए.ए.जोशी (9637240406) आणि डॉ.एस.के.सदावर्ते (9881771384) यांच्याशी संपर्क साधावा.