Thursday, December 8, 2022

वनामकृवित आयोजित आरोग्‍य शिबिरात २९२ विद्यार्थीनींची मोफत तपासणी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ येथे सहा महिला वसतिगृहातील विद्यार्थीनी व महिला कर्मचा-यांकरीता 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियांना अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन दिनांक २६ नोव्‍हेबर रोजी करण्यात आले. शिबीराच्‍या उदघाटन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले हे होते, तर प्रमुख पाहुणे म्‍हणुन परभणी मनपाचे अतिरिक्‍त आयुक्‍त डॉ. रणजित पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमास मनपाच्‍या वैद्यकीय आरोग्‍य अधिकारी डॉ सावंत मॅडम, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ जी एम वाघमारे, मुख्‍य वसतीगृह अधिक्षक डॉ राजेश कदम, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ. सचिन मोरे, आरोग्‍य अधिकारी डॉ श्रीपाद गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात डॉ धर्मराज गोखले म्‍हणाले की, आजच्‍या बदलत्‍या जीवनशैली व आहाराच्‍या सवयींमुळे महिलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. महाविद्यालयीन विद्यार्थीनींनी जेवणात जंक फुडचा वापर कमी करून सकस आहार घ्यावा. तसेच नियमित व्यायाम करण्‍याचा सल्‍ला देऊन विद्यापीठात महिला कर्मचारी व या प्रसंगी सरांनी विद्यार्थीनींकरीता नियमित योग प्रशिक्षण आयोजित करण्‍याचे आश्वासन दिले.

अतिरिक्त आयुक्त डॉ. रणजीत पाटील यांनी महिला आरोग्या करीता विशेष काळजी व आवश्यक सर्व सुविधा पुरविण्याकरीता परभणी मनपा कटिबध्द असल्याची सांगितले. प्रास्‍ताविकात डॉ. सावंत मॅडम यांनी 'माता सुरक्षित तर घर सुरिक्षत' अभियानाच्या उद्दीष्टयाबाबत माहिती देऊन  महिलांच्या सर्वसाधारण आजार, आवश्यक आरोग्‍याची काळजी व उपचार यावर मार्गदर्शन केले. महिलांनी आरोग्य समस्यांकडे दुर्लक्ष न करता योग्य उपचार घेणे हे सदृढ समाज बांधणीकरीता आवश्यक असल्याचे मत त्‍यांनी व्यक्त केले.

आरोग्य शिबीरात २६७ विद्यार्थीनी व २५ महिला कर्मचारी असे एकुण २९२ आरोग्य तपासणी करण्यात आली. राजमाता जिजाऊ वसतीगृह, परभणी येथे परभणी महानगरपालिकाच्या वतीने शिबीराकरीता वैद्यकीय सहकार्य उपलब्ध करुन देण्यात आले. आरोग्य शिबीरात नेत्र तपासणी, दंत तपासणी व आवश्यक रक्त चाचण्या करण्यात आल्या, पुढील उपचार आवश्यक असलेल्या विद्यार्थीनीना विद्यापीठातील वैद्यकीय रुग्णालयात नोंदणी करुन वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. विद्यापीठातील सहा वसतीगृहांतील विद्यार्थीनी आणि महिला कर्मचारी यांच्‍या करिता सदर शिबीराचे आयोजन मुख्य वसतीगृह अधिक्षक डॉ. राजेश कदम यांच्या पुढाकाराने करण्‍यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. एफ. एस. खान यांनी केले तर आभार डॉ. सुनिता पवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेकरीता वसतिगृह अधिक्षिका डॉ गोदावरी पवार, डॉ अनुराधा लाड, डॉ. मिना वानखेडे, डॉ. अंबिका मोरे, श्री संजय पाटील, स्नेहल शिलेवंत, सारिका नारळे, मुरके, विष्‍णु ढगे, सय्यद इरफान, ज्ञानेश्वर जाधव, सुनिल शिंदे आदींनी परिश्रम घेतले.