Wednesday, October 30, 2013

कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ एन डी पवार यांना विस्‍तार शिक्षण विभागाच्‍या वतीने निरोप

कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ एन डी पवार यांना विस्‍तार शिक्षण विभागाच्‍या वतीने निरोप समारंभात सत्कार करतांना विद्यापीठाचे कुलसचिव श्री का वि पागिरे व विस्‍तार शिक्षण विभागाचे विभाग प्रमुख डॉ बी एम ठोंबरे


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ एन डी पवार दि 31 ऑकटोबर 2013 रोजी सेवानिवृत्त झाले. त्‍यानिमित्‍त विस्‍तार शिक्षण विभागाच्‍या वतीने त्‍यांना निरोप देण्‍यात आला. कार्यक्रमास विद्यापीठाचे कुलसचिव श्री का वि पागिरे, विभाग प्रमुख डॉ बी एम ठोंबरे, कृषि अर्थशास्‍त्र विभागाचे प्रमुख डॉ बी आर पवार, डॉ जे व्‍ही एकाळे, डॉ पी आर देशमुख, डॉ आर पी कदम, डॉ प्रविण कापसे, प्रा शुभांगी देशमुख, डॉ कांबळे, श्री सी एस नखाते आदी उपस्थित होते. याप्रसंगी डॉ एन डी पवार यांचा शाल व श्रीफळ देउन विभाग प्रमुख डॉ बी एम ठोंबरे यांनी सत्‍कार केला. या‍वेळी डॉ पवार यांनी मनोगतात म्‍हणाले कि, सर्वाच्‍या सहकार्याने विद्यापीठातील सेवेचा कार्यकाल यशस्‍वीपणे पुर्ण करू शकलो, विशेषता त्‍यांच्‍या कार्यकाळात निम्‍नस्‍तर शिक्षणाचे सहयोगी संचालक पदावर कार्यकाळात कृषि पद‍वीका सर्व शाळेच्‍या प्रवेश प्रक्रिया ऑन लाईन करण्‍यात आली, ही विद्यापीठाच्‍या दृष्टिने महत्‍वाचा निर्णय अमलात आणु शकलो, यामुळे विद्यार्थींना प्रवेश प्रक्रियेतील अडचणी कमी झाल्‍या. त्‍यांच्‍या कार्यकाळात सर्व विभागाचे बळकटीकरण व आंतरराष्ट्रिय वसतीगृह व सर्व विद्यार्थ्‍याचे वसतीगृ‍हाचे नुतनीकरण व अद्यावतीकरण करण्‍यात आले. काही काळ त्‍यांनी विस्‍तार शिक्षण संचालक म्‍हणुनही कार्य केले. विभाग प्रमुख डॉ बी एम ठोंबरे यांनी कार्यक्रमाच्या शेवटी आभार मानले.  

Monday, October 28, 2013

ग्रामीण गृहविज्ञान कार्यानुभव कार्यानुभव यशस्‍वी सांगता





      वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या गृहविज्ञान महाविद्यालयातील अंतिम वर्षातील सातव्‍या सत्राचे विद्यार्थी ग्रामीण जीवनशैली अभ्‍यासण्‍यासाठी तसेच गृहविज्ञान या विषयाचे आत्‍मसात केलेले ज्ञान व तंत्रज्ञानाचा प्रसार करण्‍यासाठी ग्रामीण गृहविज्ञान कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत 21 ऑगष्‍ट 2013 पासून पोखर्णी नृसिंह येथे कार्यरत होते. या ठिकाणी प्रत्‍येक विद्यार्थ्‍यांनी पाच कुटूंब दत्‍तक येऊन त्‍यांचे सर्वेक्षण करुन त्‍यांच्‍या गृहविज्ञानाशी निगडीत गरजांवर आधारीत कार्यक्रमाची आखणी केली. प्रारंभी पोखर्णी येथील नृसिंह विद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांचा सहभाग घेऊन गावफेरी काढण्‍यात आली. या विद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांसाठी संभाषण कौशल्‍य व व्‍यक्‍तीमत्‍व विकास, महिलांसाठी गरोदर मातांची व बालकांच्‍या काळजी कशी घ्‍यावी आणि सर्वांगीण विकास याबाबत महाविद्यालयाच्‍या प्राचार्या प्रा. विशाला पटनम यांनी कार्यशाळेद्वारे मार्गदर्शन केले. तसेच गृहविज्ञान तंत्रज्ञानाबाबतचे प्रदर्शन नृसिंह मंदीर सभागृहामध्‍ये आयोजीत केले होते. प्रदर्शनाचे उद्घघाटन सरपंच श्री मदनराव वाघ यांचे हस्‍ते करण्‍यात आले होते. प्रदर्शनास पोखर्णी येथील बहूसंख्‍य महिला व पुरूषांनी भेट दिली. गृहविज्ञान तंत्रज्ञान जास्‍तीत जास्‍त ग्रामीण महिलांपर्यंत पोहचविण्‍यासाठी प्रयत्‍न व्‍हावेत असे मनोगत सरपंच मदनराव वाघ यांनी याप्रसंगी व्‍यक्‍त केली. रावेच्‍या विद्यार्थ्‍यांनी ग्राम स्‍वच्‍छता अभियान राबवुन ग्रामपंचायत कार्यालय, गावातील मंदीरे व त्‍यांचा परिसर स्‍वच्‍छ केला. नाविन्‍यपूर्ण गृहविज्ञान तंत्रज्ञानाचा अवलंबन करुन पोखर्णी येथील महिलांनी विविध खाद्यपदार्थ, बांधणी काम, शोभीवंत तयार केलेल्‍या वस्‍तूंच्‍या प्रदर्शन मांडण्‍यात आले. या प्रदर्शनाचे उद्घघाटन डॉ. हेमांगीनी सरंबेकर यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले व त्‍यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या दोन महिन्‍याच्‍या कालावधीत महाविद्यालयाच्‍या अन्‍न व पोषण विभागाच्‍या प्रमुख डॉ. विजया नलवडे, विस्‍तार विभाग प्रमुख डॉ. प्रभा अंतवाल व डॉ. फारुखी फरजाना यांनी महिलांनी विविध तंत्रज्ञानावर मार्गदर्शन केले. समारोपाच्‍या कार्यक्रमाप्रसंगी महिलांनी प्रतिक्रिया देताना विद्यार्थींनीकडून विविध पाककृती, मानव विकास, वस्‍त्र अभिकल्‍पना, कौटूंबिक व्‍यवस्‍थापन, निरोगी रहाण्‍यासाठी तसेच विविध आजारामध्‍ये आहाराचे नियोजन इ. बद्दल सखोल माहिती मिळाली व त्‍यांच्‍या ज्ञानात भर पडली असे गृहविज्ञान महाविद्यालय व विद्यापीठाबाबत गौरवास्‍पद उद्गगार काढले. संपूर्ण कार्यक्रमांचे नियोजन प्राचार्या प्रा. विशाला पटनम यांच्‍या मार्गदर्शनानुसार समन्‍वयक डॉ. शंकर पूरी व विद्यार्थ्‍यांनी रेश्‍मा मल्‍लशे, वेदांती मुळे, अनुराधा डोके, शमशाद शेख, संध्‍या देशमुख, गिता सामला, स्‍नेहल कारले आणि मिनाक्षी मगर यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी सरपंच मदनराव वाघ, उपसरपंच शेषेराव वाघ, नृसिंह मंदीर व्‍यवस्‍थापन समिती, मुख्‍याध्‍यापक सय्यद सर, अंगणवाडी पर्यवेक्षीका यादव मॅडम व त्‍यांच्‍या सर्व सहकारी आणि समस्‍त गांवक-यांचे सहकार्य लाभले. 

Friday, October 25, 2013

प्राचार्या प्रा विशाला पटनम ह्या डॉ. राधाकृष्‍णन सुवर्ण पदक व भारत सेवा रतन सुवर्ण पदकांनी सन्‍मानीत


डॉ. सर्वपल्‍ली राधाकृष्‍णन यांच्‍या 125 व्‍या जयंती निमित्‍त चेन्‍नई येथील ग्‍लोबल इकॉनॉमीक प्रोग्रेस एन्ड रिसर्च असोशियशन या संस्‍थेतर्फे गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्या प्रा. विशाला पटनम यांना शिक्षण व संशोधन क्षेत्रामध्‍ये केलेल्‍या उत्‍कृष्‍ट कार्याबद्दल डॉ. राधाकृष्‍णन सुवर्ण पदकांनी तर वैयक्‍तीक मिळविलेल्‍या नावलौकीकाबद्दल भारत सेवा रतन सुवर्ण पदकांनी सन्‍मानीत करण्‍यात आले. या पुरस्‍कारांचे वितरण चेन्‍नई येथे दिनांक 19 ऑक्‍टोंबर 2013 रोजी माजी कायदा व न्‍याय मंत्री के. वेंकटपथी आणि मद्रास उच्‍च न्यायालयाचे न्‍यायाधीश एस जगदिसन यांच्‍या हस्‍ते कॉन्‍ट्रीब्‍युशन टु इज्‍युकेशन अन्‍ड नॅशनल डेव्‍हलपमेंट याविषयावर आयोजीत 14 व्‍या राष्‍ट्रीय परिसंवादाच्‍या कार्यक्रमामध्‍ये करण्‍यात आले. यानिमित्य गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या सर्व शिक्षक, शिक्षकेत्‍तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी त्‍यांचे सत्‍कार करून अभिनंदन केले.

Thursday, October 24, 2013

‘गहु पिकांत एकात्मिक अन्‍नद्रव्‍य व्‍यवस्‍थापन’ याविषयावर मार्गदर्शन

दि 25 ऑक्‍टोबर 2013 शुक्रवार रोजी सायंकाळी 7.30 वाजता आकाशवाणी परभणी केंद्राच्‍या आमचं घर, आमचं शिवार या कार्यक्रमात गहु पिकांत एकात्मिक अन्‍नद्रव्‍य व्‍यवस्‍थापन याविषयावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या दिर्द्यकालीन खत प्रयोग योजनेचे सहायक प्राध्‍यापक डॉ सुदाम शिराळे मार्गदर्शन करणार आहेत.

Wednesday, October 23, 2013

गृहविज्ञान तंत्रज्ञानाचे प्रदर्शन


महिलांना मार्गदर्शन करतांना गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या प्रभारी प्राचार्या डॉ. हेमांगिनी सरंबेकर व्यासपीठावर डॉ. विजया नलवडे, डॉ. प्रभा अंतवाल व समन्‍वयक डॉ. शंकर पुरी 

गृहविज्ञान तंत्रज्ञानाचे प्रदर्शनाची पाहणी करतांना गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या प्रभारी प्राचार्या डॉ. हेमांगिनी सरंबेकर व्यासपीठावर डॉ. विजया नलवडे, डॉ. प्रभा अंतवाल

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या ग्रामीण गृहविज्ञान कार्यानुभव कार्यक्रम नृसिंह पोखर्णी येथे दोन महिन्‍यापासून राबविण्‍यात येत असुन या कार्यक्रमामध्‍ये येथील महिलांना महाविद्यालयाच्‍या विद्यार्थीनींनी अन्‍न व पोषण, कौटुंबिक साधनसंपत्‍ती व्‍यवस्‍थापन, मानव विकास व कौटुंबिक अभ्‍यास, वस्‍त्र व परिधान अभिकल्‍पना तसेच संदेशवहन याबाबतीत नाविन्‍यपुर्ण गृहविज्ञान तंत्रज्ञानाची माहिती दिली. या माहितीची महिलांनी भरपूर लाभ झाला तसेच महिलांनी आत्‍मसात केलेल्‍या तंत्रज्ञानाचा वापर करुन त्‍यांनी विविध खाद्य पदार्थ, बांधणी काम, शोभिवंत वस्‍तू तयार केल्‍या आणि याचे प्रदर्शन पोखर्णी येथील नृसिंह मंदिर संस्‍थान सभागृहात आयोजित करण्‍यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घघाटन महाविद्यालयाच्‍या प्रभारी प्राचार्या डॉ. हेमांगिनी सरंबेकर यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. या प्रसंगी त्‍यांनी उपस्थित महिलांना विविध गृहविज्ञान तंत्रज्ञानावर मार्गदर्शन केले. तसेच महा‍विद्यालयातील अन्‍न व पोषण विभागाच्‍या प्रमुख डॉ. विजया नलवडे यांनी जागतिक अन्‍न दिनानिमित्‍त अन्‍न व पोषण आहार यावर तर डॉ. प्रभा अंतवाल यांनी विद्यापीठाच्‍या विविध कार्याविषयी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केल्रे. या प्रसंगी उपस्थित महिलांनी मनोगतात सांगितले कि महाविद्यालयाच्‍या विद्यार्थींनी कडून विविध पाककृती, मानव विकास, वस्‍त्र अभिकल्‍पना, कौटूंबिक व्‍यवस्‍थापन, निरोगी रहाण्‍यासाठी तसेच विविध आजारामध्‍य आहाराचे नियोजन इ. बद्दल सखोल माहिती मिळाली व त्‍यांच्‍या ज्ञानात भर पडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रेश्‍मा मल्‍लेशा यांनी केले तर आभार वेदांती मुळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी कार्यानुभव कार्यक्रमाचे समन्‍वयक डॉ. शंकर पुरी यांच्‍या मार्गदर्शनाखाली अनुराधा डोके, शमशाद शेख, संध्‍या देशमुख, गीता सामला, स्‍नेहल कारले आणि मिनाक्षी मगर यांनी परिश्रम घेतले. तसेच कार्यक्रमासाठी नृसिंह मंदिर समितीचे विशेष सहकार्य मिळाले. कार्यक्रमात महिलांनी मोठ्या प्रमाणात उत्‍स्‍फुर्तपणे सहभाग नोंदवला.

Tuesday, October 22, 2013

मराठवाडयाकरिता कृषि हवामान सल्ला

भारतीय हवामान विभागमुबई यांचेकडून प्राप्‍त झालेल्‍या हवामान अंदाजानुसार, मराठवाडा विभागामध्‍ये पुढील आठवडयात आकाश अंशतः ढगाळ राहील. औरंगाबाद व उस्‍मानाबाद जिल्‍हयात तुरळक ठिकाणी हलक्‍या स्‍वरूपाचा पाउस पडण्‍याची शक्‍यता आहे. कमाल तापमान २७.० ते ३४.० अंश सेल्‍सीअस राहील तर किमान तापमान १७.० ते २२.० अंश सेल्‍सीअस राहील. वारा ताशी ६.० ते १२.० कि.मी. प्रति तास वेगाने वाहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५८.० ते ९९.० टक्‍के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३३.० ते ७९.० टक्‍के राहील.

विशेष सुचना या आठवडयात  आकाश अंशतः ढगाळ राहील.

शेतकरी बांधवाना कृषि सल्‍ला

कापूस

तुडतुडे, पांढरी माशी, दहिया, लाल्‍या  
कापूस पिकात तुडतुडे, पांढरी माशी, दहिया व लाल्‍या रोगाचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे. तुडतुड्यांचे निरूंत्रणासाठी असिटामेप्रीड २० टक्‍के २ ग्रॅम किंवा मिथिलडिमेटॉन २५ टक्‍के ८ मिली, पांढरी माशीचे नियंत्रणासाठी ट्रायझोफॉस ४० टक्‍के २० मिली किंवा असिफेट ७५ टक्‍के २० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी दहीया रोगाच्‍या नियंत्रणासाठी पाण्‍यात विरघळणारा गंधक २५ ग्रॅम तर लाल्‍या रोगाच्‍या नियंत्रणासाठी मॅग्‍नेशियम सल्‍फेट अधिक पोटॅशियम नायट्रेट प्रत्‍येकी ४० ग्रॅम प्रत्‍येकी प्रती दहा लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी.  
तुर

तुरीचे पिक गाठी धरण्‍याच्‍या अवस्‍थेत आहे. शेंगा पोखरणारी अळी पिसारी पतंग व शेंगमाशी यांचा प्रतिबंधात्‍मक उपाय म्‍हणून फुलकळीच्‍या अवस्‍थेत ५ टक्‍के निंबोळी अर्क अधिक १ टक्‍का साबनेचा चुरा अधिक क्विनॉलफॉस २५ टक्‍के १६ मिली प्रती १० लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी.
उस

पूर्व हंगामी ऊसाची लागवड १५ नोव्‍हेंबर पर्यंत पुर्ण करावी. लागवडीसाठी को-८६०३२ (निरा), को-९४०१२, को.सी.६७१, को-८०१४, को.९९००४, या वाणांचा वापर करावा. ऊसाचे बेणे जाड रसरशीत, डोळे जोमदार व फुगीर असावेत, बेण्‍याचे वय ०९ ते ११ महिन्‍याचेअसावे. किड व रोगमुक्‍त बेण्‍याचा वापर करावा. लागवडी पूर्वी बेणे मॅलॅथिऑन ३०० मिली व बाविस्‍टीन (१०० ग्रॅम) १०० लिटर पाण्‍याच्‍या द्रावणात १० ते १५ मिनीटे बुडवून घ्‍यावे.
आंबा

आंब्‍यावर तुडतुडे आढळल्‍यस सांयपरमेथ्रीन २५ ईसी ३ मिली किंवा फेनवलरेट २० ईसी ५ मीली १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारावे.तसेच भुरी रोग आढळल्‍यास कार्बेंडायझीम १० ग्रॅम १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी. बागेमध्‍ये तुट आढळुन आल्‍यास दुसरे रोप लावुन तुट भरून काढावी. सिंचन सुविधा उपलब्‍ध असल्‍यस रब्‍बीची अंतरपीके घ्‍यावीत. झाडास आळे करून घ्‍यावीत. 
संत्रा मोसंबी
बुरशीजन्‍य रोग
संत्रा/मोसंबीचे बागेत बुरशीजन्‍य रोगांचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. त्‍याचे नियंत्रणसाठी १ टक्‍के बोर्डोमिश्रणाची फवारणी करावी.
पेरू

पेरूच्‍ बागेत फळमाशीच्‍या नियंत्रणसाठी मीथीलयुजेनॉलयुक्‍त सापळे हेक्‍टरी ५ या प्रमाणात लावावेत.
अंजीर
तांबेरा
बागेत पावसाचे पाणी साचणार नाही याची काळजी घ्‍यावी. तसेच शेंडेमर आढळल्‍यसा रोगग्रस्‍त फाद्या काढून त्‍या ठिकाणी बोर्डेपेस्‍ट लावावे.
सिताफळ
काढणी अवस्‍था
पक्‍व फळांची काढणी करावी. प्रतवारी करून बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवावे.
कागदीलिंबु
देवीरोग
पाने खाणारी अळीचा प्रादूर्भाव बागेत आढळल्‍यास क्विनॉलफॉस २० मिली १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारावे. 
फुलशेती

गुलाबावर भुरी रोग आढळलयास डायफॅन्‍कॅनाझोल ०.०५ टक्‍के या बुरशीनाशकाची दर आठ दिवसाच्‍या अंतराने फवारणी करावी. निशिगंधाच्‍या पानावर ठिपके व करपा रोग आढळल्‍यास झायरम ०.३ टक्‍के किंवा डायथेन एम-४५ -०.२५ टक्‍के या बुरशीनाशकाची फवारणी करावी.
पशुधन व्‍यवस्‍थापन  : जनावरांना खुरकुत रोगाची लस टोचुन घ्‍यावी.


सौजन्य 
केंद्र प्रमुख
एकात्मिक कृषि हवामान सल्‍ला सेवा योजना


हवामानशास्‍त्र विभाग, वनामकृवि, परभणी
पञक क्रमांकः ५४
दिनांकः २२.१०.२०१३

Tuesday, October 15, 2013

मराठवाडयाकरिता कृषि हवामान सल्ला

भारतीय हवामान विभाग, मुबई यांचेकडून प्राप्‍त झालेल्‍या हवामान अंदाजानुसार, मराठवाडा विभागामध्‍ये पुढील आठवडयात आकाश अंशतः ढगाळ राहील. उस्‍मानाबाद, व लातुर जिल्‍हयात तुरळक ठिकाणी हलक्‍या स्‍वरूपाचा पाउस पडण्‍याची शक्‍यता आहे. कमाल तापमान ३१.० ते ३३.० अंश सेल्‍सीअस राहील तर किमान तापमान १९.० ते २२.० अंश सेल्‍सीअस राहील. वारा ताशी २.० ते ९.० कि.मी. प्रति तास वेगाने वाहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६२.० ते ८९.० टक्‍के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३६.० ते ५८.० टक्‍के राहील.
विशेष सुचना : या आठवडयात  आकाश अंशतः ढगाळ राहील.

शेतकरी बांधवांसाठी कृषि सल्‍ला

कापूस

फुलकिडे, तुडतुडे, पांढरी माशी
कापूस पिकात रस शोषण करणा-या किडींच्‍या प्रादूर्भावामुळे व जमीनीतील सतत ओलाव्‍यामुळे कापसाची पाने लाल पडत  आहे. रस शोषण करणा-या किडींचे नियंत्रणासाठी असिफेट ७५ टक्‍के २० ग्रॅम अधिक थायामिथॉक्‍झाम २५ टक्‍के; २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्‍यातून मिसळुन फवारणी करावी. पानावरील लालसरपना कमी करण्‍यासाठी सोबत २ टक्‍के डीएपी किंवा युरीयाचा वापर करावा.      
तुर
पाने गुंडाळणारी अळी
तुरीचे पिकात पाने गुंडाळणा-या अळीचा प्रादूर्भाव दिसुन येत असल्‍यास त्‍याचे नियंत्रणसाठी डायमिथोएट १० मिली किंवा मोनोक्रोटोफॉस १५ मिली अधिक १० मिली स्‍टीकर प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करवी. 
उस

जमीनीत वापसा येताच पुर्वमशागतीचे कामे पुर्ण करून पुर्व हंगामी उसाचे लागवडीसाठी हलक्‍या जमीनीत ९० सेंमी; मध्‍यम जमीनीत १२० सेंमी तर भारी जमीनीत १५० सेंमी अंतरावर स-या पाडाव्‍यात व १५ नोव्‍हेंबर पर्यंत लागवड करावी. लागवडी पुर्वी बेणे मॅलॅथिऑन ३०० मिली अधिक बाविस्‍टीन १०० ग्रॅम १०० लिटर पाण्‍यात मिसळुन या द्रावणात१५ मिली बेणे बुडवुन लागवड करावी.
आंबा

आंब्‍यावर तुडतुडे आढळल्‍यस सांयपरमेथ्रीन २५ ईसी ३ मिली किंवा फेनवलरेट २० ईसी ५ मीली १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारावे.तसेच भुरी रोग आढळल्‍यास कार्बेंडायझीम १० ग्रॅम १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी. बागेमध्‍ये तुट आढळुन आल्‍यास दुसरे रोप लावुन तुट भरून काढावी. सिंचन सुविधा उपलब्‍ध असल्‍यस रब्‍बीची अंतरपीके घ्‍यावीत. झाडास आळे करून घ्‍यावीत. 
संत्रा मोसंबी
बुरशीजन्‍य रोग
संत्रा/मोसंबीचे बागेत बुरशीजन्‍य रोगांचा प्रादूर्भाव दिसून येत आहे.त्‍याचे नियंत्रणसाठी १ टक्‍के बोर्डोमिश्रणाची फवारणी करावी.
पेरू

पेरूच्‍या बागेत फळमाशीच्‍या नियंत्रणसाठी मीथीलयुजेनॉलयुक्‍त सापळे हेक्‍टरी ५ या प्रमाणात लावावेत.
अंजीर
तांबेरा
बागेत पावसाचे पाणी साचणार नाही याची काळजी घ्‍यावी. तसेच शेंडेमर आढळल्‍यसा रोगग्रस्‍त फाद्या काढून त्‍या ठिकाणी बोर्डेपेस्‍ट लावावे.
सिताफळ
काढणी अवस्‍था
पक्‍व फळांची काढणी करावी. प्रतवारी करून बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवावे.
कागदीलिंबु
देवीरोग
पाने खाणारी अळीचा प्रादूर्भाव बागेत आढळल्‍यास क्विनॉलफॉस २० मिली १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारावे. 
फुलशेती

गुलाबावर भुरी रोग आढळलयास डायफॅन्‍कॅनाझोल ०.०५ टक्‍के या बुरशीनाशकाची दर आठ दिवसाच्‍या अंतराने फवारणी करावी. निशिगंधाच्‍या पानावर ठिपके व करपा रोग आढळल्‍यास झायरम ०.३ टक्‍के किंवा डायथेन एम-४५ -०.२५ टक्‍के या बुरशीनाशकाची फवारणी करावी.
पशुधन व्‍यवस्‍थापन  : जनावरांना खुरकुत रोगाची लस टोचुन घ्‍यावी.

सौजन्‍य
केंद्र प्रमुख
एकात्मिक कृषि हवामान सल्‍ला सेवा योजना
पञक क्रमांकः ५२                                              
दिनांकः १५.१०.२०१३