माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे भव्य उद्घाटन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषि महाविद्यालयात सुरू
असलेल्या गणेशोत्सव २०२५ निमित्त विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व
विकासासाठी आणि क्रीडाभाव वृद्धीसाठी भव्य क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले
आहे.
या क्रीडा महोत्सवांतर्गत क्रिकेट स्पर्धेचे भव्य उद्घाटन दिनांक ४
सप्टेंबर रोजी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते
संपन्न झाले. या प्रसंगी उद्घाटन सोहळ्याला विशेष उपस्थिती शिक्षण संचालक डॉ.
भगवान आसेवार यांची लाभली. तसेच या कार्यक्रमाला कृषि महाविद्यालयाचे सहयोगी
अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, जिमखाना उपाध्यक्ष डॉ. रावसाहेब भाग्यवंत आदी मान्यवरांनी उपस्थित राहून
कार्यक्रमाची शोभा वाढवली.
उद्घाटनावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यार्थ्यांना
संबोधित करताना सांगितले की, क्रीडा ही केवळ स्पर्धा नसून ती जीवनशैली घडविणारी,
शिस्त, एकजूट आणि परस्पर सहकार्य वाढवणारी प्रेरक
शक्ती आहे. विद्यापीठातील विद्यार्थी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकावेत,
यासाठी असे क्रीडा उपक्रम अत्यंत महत्त्वाचे ठरतात.
या क्रीडा स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा स्पर्धा समितीचे अध्यक्ष
डॉ. विक्रम घोळवे, सचिव डॉ. धीरज पाथ्रीकर तसेच गणेशोत्सव आयोजन समितीतील सर्व सदस्य विद्यार्थी यांनी मोलाचे योगदान दिले आहे.