सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचे भारतीय अभियांत्रिकी आणि जलसिंचन क्षेत्रात अद्वितीय योगदान... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिन
उत्साहात साजरा करण्यात आला. भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस
म्हणून दरवर्षी १५ सप्टेंबर हा दिवस अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. महाविद्यालयाच्या
जिमखाना विभाग व आयएसएई शाखा, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते आणि शिक्षण
संचालक डॉ. भगवान आसेवार हे प्रमुख पाहुणे होते. व्यासपीठावर कार्यक्रमाचे आयोजक जिमखाना
उपाध्यक्ष डॉ. सुभाष विखे व परभणी आयएसएई शाखेचे सचिव डॉ. विशाल इंगळे उपस्थित
होते.
अध्यक्षीय भाषणात माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या
यांनी भारतीय अभियांत्रिकी आणि जलसिंचन क्षेत्रात अद्वितीय योगदान दिले आहे. त्यांच्या
स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस विशेष महत्त्वाचा आहे. अभियंते हे आधुनिक भारताचे शिल्पकार
असून विज्ञान-तंत्रज्ञान, पूल, धरणे, रस्ते, इमारती, माहिती तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांत ते देशाच्या प्रगतीसाठी
सतत कार्यरत आहेत. आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी अभियंत्यांचे योगदान अधिक
महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी शिक्षण संचालक
डॉ. भगवान आसेवार यांनी सांगितले की,
सर विश्वेश्वरय्या यांचे शिस्तबद्ध व
कार्यतत्पर व्यक्तिमत्त्व हे तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल. सहयोगी अधिष्ठाता डॉ.
राहुल रामटेके यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या
यांच्या आदर्श जीवनचरित्राचा आढावा घेतला.
या कार्यक्रमास
विभाग प्रमुख डॉ रावसाहेब भाग्यवंत, डॉ. मदन पेंडके, डॉ. हरीष आवारी, डॉ. पंडीत मुंडे, डॉ. दयानंद टेकाळे, डॉ. रघुनाथ जायभाये, डॉ. सुमंत जाधव, डॉ. गोपाळ शिंदे, डॉ. मधुकर मोरे, डॉ.रविंद्र शिंदे, डॉ.
प्रमोदिनी मोरे, डॉ. शैलजा देशवेना,
डॉ. अनिकेत वाईकर, डॉ.अश्विनी गावंडे, इंजि. लक्ष्मीकांत
राऊतमारे तसेच प्रथम वर्षाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थी
प्रतिनिधी आभा सिंह, सतेज मेटकर, नयन लोनगाडगे यांनी विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किंजल मोरे व तनुजा वाघ यांनी केले. जिमखाना उपाध्यक्ष
डॉ. सुभाष विखे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. गजानन वसू, श्री. राजाराम वाघ, श्री. मंचक डोंबे, श्री. प्रमोद राठोड
तसेच विद्यार्थी राध्येशाम खटींग, अभिषेक कदम, यश ढाकणे, राम शेंडगे इत्यादींनी परिश्रम घेतले.