वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र
आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्यादित, सोंन्ना (ता. पूर्णा, जि. परभणी) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २ सप्टेंबर रोजी ऊस पीक
परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.
या परिसंवादात विस्तार कृषि विद्यावेत्ता तसेच व्यवस्थापक, कृषि तंत्रज्ञान
माहिती केंद्र, डॉ. गजानन गडदे यांनी सुपर केन नर्सरी,
ऊस पिकाचे सुधारित लागवड तंत्रज्ञान, तसेच ऊस
पिकातील एकात्मिक तण व अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
तसेच श्री. मधुकर मांडगे यांनी ऊस पिकातील एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन याविषयी
उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी आयोजित चर्चासत्रात शेतकऱ्यांनी ऊस पिकांबाबत
विचारलेल्या शंकांचे शास्त्रज्ञांनी समाधानकारक निरसन केले.
सदरील कार्यक्रमास श्री. शरद दराडे, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, पूर्णा, विविध
कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्यादितचे चेअरमन श्री. बळीराम शंकरराव कदम,
व्हाईस चेअरमन श्री. गणेश रंगनाथ कदम, सचिव
श्री. पी. व्ही. चव्हाण, सोसायटीचे सर्व संचालक, पिंपळगाव (लिखा) गावचे सरपंच श्री. नागनाथ मोरे, गौर
गावचे सरपंच श्री. अनंता पारवे तसेच सोन्ना गावातील एकूण १२८ शेतकरी मोठ्या
संख्येने उपस्थित होते.