Tuesday, September 2, 2025

वनामकृविच्या कृषि महाविद्यालयातील एनसीसी युनिटला ग्रुप कमांडर ब्रिगेडियर श्री अनुप बरबरे व कर्नल श्री दिलीप रेड्डी यांची भेट

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषि महाविद्यालयातील एनसीसी युनिटला ग्रुप कमांडर ब्रिगेडियर श्री. अनुप बरबरे व कमांडिंग ऑफिसर कर्नल श्री. दिलीप रेड्डी यांनी दिनांक २ सप्टेंबर रोजी भेट दिली. या दौऱ्यात त्यांनी सर्वप्रथम महाविद्यालयातील एनसीसी कार्यालयाची पाहणी करून उत्कृष्ट व्यवस्थापन, स्वच्छता व शिस्तबद्ध कामकाज याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच या कार्यालयाला बटालियनमधील सर्वोत्तम कार्यालय” म्हणून गौरविले.

दौऱ्यादरम्यान ब्रिगेडियर श्री. अनुप बरबरे व कर्नल श्री. दिलीप रेड्डी यांनी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची औपचारिक भेट घेतली. या वेळी विविध शैक्षणिक, सामाजिक व व्यक्तिमत्व विकासाशी संबंधित उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा झाली.

यानंतर त्यांनी एनसीसी कॅडेट्सशी संवाद साधत नेतृत्वगुणांचे महत्त्व स्पष्ट केले. कॅडेट्सना समाजसेवा, राष्ट्रसेवा व शिस्तीचे महत्त्व पटवून देत भविष्यात जबाबदारीची जाणीव ठेवून कार्य करण्याचे मार्गदर्शन केले.

या प्रसंगी शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, कुलसचिव श्री संतोष वेणीकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, विभागप्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, कृषि महाविद्यालयाचे छात्रसेना अधिकारी लेफ्टनंट जयकुमार देशमुख तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.