Wednesday, April 20, 2022

वनामकृविचा २४ वा दीक्षांत समारंभ शुक्रवारी

दीक्षांत समारंभात ४२३२ स्‍नातकांना विविध पदवीने अनुग्रहीत करण्‍यात येणार  ....... कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांची पत्रकार परिषदेत माहिती


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा चोविसावा दीक्षांत समारंभ दिनांक २२ एप्रिल रोजी सकाळी ११.०० वाजता विद्यार्थी कल्‍याण अधिकारी कार्यलयाच्‍या जवळील नुतन सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहात आयोजित करण्‍यात आला असुन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी महाराष्‍ट्र राज्‍याचे माननीय राज्‍यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती मा. श्री. भगत सिंह कोश्‍यारी हे दूरदृश्‍य प्रणालीव्‍दारे भुषविणार आहेत. महाराष्‍ट्र राज्‍याचे कृषिमंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती मा. ना. श्री. दादाजी भुसे हे प्रमुख अतिथी म्‍हणुन उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणुन उदयपुर राजस्‍थान येथील महाराणा प्रताप कृषि आणि तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. नरेंद्र सिंह राठौर हे उपस्थित राहुन दीक्षांत भाषण करणार आहे, अशी माहिती कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांनी दिनांक २० एप्रिल रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेस शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धीरजकुमार कदम, प्राचार्य डाॅ सय्यद ईस्माइल, जिल्‍हा माहिती अधिकारी श्री अरूण सुर्यवंशी, उपकुलसचिव डॉ गजानन भालेराव, विभाग प्रमुख डॉ डिगांबर पेरके, डॉ राजेश कदम, डॉ संजीव बंटेवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू मा डॉ अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, परभणी कृषि विद्यापीठ स्‍थापनेचे हे सुवर्ण महोत्‍सवी वर्ष आहे, या दीक्षांत समारंभा प्रसंगी नवीन बांधकाम केलेले सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहाचे उदघाटन दुरदृश्‍य प्रणालीव्‍दारे माननीय राज्‍यपाल महोदयाच्‍या हस्‍ते होणार आहे. तसेच औंढे नागनाथ तालुक्‍यातील गोळेगांव येथील कृषि महाविद्यालयाच्‍या नवीन इमारत, बायोमिक्‍स निर्मिती केंद्राची नुतन इमारत तसेच सावित्रीबाई फुले मुलींच्‍या वसतीगृहाचे उदघाटन माननीय कृषिमंत्री श्री दादाजी भुसे यांच्‍या शुभ हस्‍ते होणार आहे. दीक्षांत समारंभास विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सन्‍माननीय सदस्‍य यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

सदरिल दीक्षांत समारंभ कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे स्‍वागतपर भाषण करणार असुन दीक्षांत समारंभात २०२०-२१ वर्षातील विविध विद्याशाखेतील एकुण ४२३२ स्‍नातकांना विविध पदवीने अनुग्रहीत करण्‍यात येणार आहे. विविध विद्याशाखेतील ३८४२ स्‍नातकांना पदवी, ३५९ स्‍नातकांना पदव्‍युत्‍तर तर ४९ स्‍नातकांना आचार्य पदवीने अनुग्रहीत करण्‍यात येणार आहे. समारंभात विविध अभ्‍यासक्रमातील विद्यापीठाने व दात्‍यांनी ठेवलेली सुवर्णपदके, रौप्‍यपदके व रोखपारितोषिके पात्र स्‍नातकांना मान्‍यवरांच्‍या हस्‍ते प्रदान करून गौरविण्‍यात येणार आहे. दीक्षांत समारंभाचे विद्यापीठाच्‍या युटुब चॅनेल youtube.com/user/vnmkv यावर थेट प्रक्षेपण करण्‍यात येणार आहेपत्रकार परिषदेचे सुत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ प्रविण कापसे यांनी केले. पत्रकार परिषदेस शहरातील प्रसारमाध्‍यमांचे प्रतिनिधी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण म्‍हणाले की, आज पर्यंत कृषि शिक्षणाच्‍या माध्‍यमातुन हजारो पदवीधारक विद्यापीठाने निर्माण झाले आहेतहे उच्‍च शिक्षित कुशल मनुष्‍यबळ विविध क्षेत्रात आपले योगदान देत आहेत. विद्यापीठाने विविध पिकांचे १४४ वाण निर्मिती केली असुन तुर, सोयाबीन, ज्‍वारी आदीं पिकांचे अनेक चांगले वाण शेतकरी बांधवात मोठया प्रमाणात प्रचलित झाले आहेतयावर्षी दहा हजार क्विंटल बीजोत्‍पादनाचे लक्ष साध्‍य करू. गेल्‍या तीन वर्षाच्‍या कार्यकाळात केवळ मुख्‍यालयी विद्यापीठ निर्मित दर्जेदार बियाणे विक्री न करता मराठवाडयातील प्रत्‍येक जिल्‍हयातील शेतकरी बांधवाना विकेंद्रीत विक्री व्‍यवस्‍था करून बियाणे उपलब्‍ध करण्‍यात आले. कोरोना विषाणु रोगाच्‍या परिस्थितीतही विद्यापीठाचे विस्‍तार कार्य कोठेही न थांबताऑनलाईन पध्‍दतीने चालुच होतेया काळात मोठया प्रमाणात वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन मोहिम राबविण्‍यात आली. गेल्‍या तीन ते चार वर्षात स्‍वच्‍छ विद्यापीठ, सुंदर विद्यापीठ, सुरक्षित विद्यापीठ उपक्रम यशस्‍वीपणे राबविण्‍यात आला. आर्थिक अडचणीतही विद्यापीठ निर्मित निविष्‍ठामधुन प्राप्‍त महसुलातुन विद्यापीठाचे कार्य चालु आहे, असे माहिती त्‍यांनी दिली.

सदरिल दीक्षान्‍त समारंभात पुढील प्रमाणे विद्यार्थ्‍यांना विविध पदवीने अनुग्रहीत करण्‍यात येणार आहे

अक्र

अभ्‍यासक्रम

एकुण स्‍नातक

 

आचार्य पदवी

 

पी. एचडी. (कृषि)

४४

पी. एचडी. (अन्‍नतंत्रज्ञान)

०२

पी. एचडी. (कृषि अभियांत्रिकी)

०३

 

एकुण आचार्य पदवीचे स्‍नातक

४९

 

पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रम

 

एम. एस्सी. (कृषि)

२५२

एम. एस्‍सी (गृहविज्ञान)

१२

एम. एस्सी. (कृषि अभियांत्रिकी)

१६

एम. टेक. (अन्‍नतंत्रज्ञान)

१५

एम. एस्सी. (उद्यानविद्या)

४१

एम. बी.ए. (कृषि व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन)

२३

 

एकुण पदव्‍युत्‍तर स्नातक

३५९

 

पदवी अभ्‍यासक्रम

 

बी. एससी. (ऑनर्स) कृषि

२५८२

बी. एससी. (ऑनर्स) उद्यानविद्या

२१

बी. एससी. (ऑनर्स) सामुदायिक विज्ञान

२२

बी. टेक. (कृषि अभियांत्रिकी)

२३३

बी. टेक. (अन्‍नतंत्रज्ञान)

५७७

बी. टेक. (कृषि जैवतंत्रज्ञान)

३२६

बी. एससी. (ऑनर्स) एबीएम

६३

 

एकुण पदवी स्‍नातक

३८२४

 

एकुण आचार्य, पदव्‍युत्‍तर पदवी आणि पदवीचे स्‍नातक

४२३२