Friday, April 8, 2022

स्‍पर्धापरिक्षेत यश प्राप्‍त करण्‍यासाठी अभ्‍यासात सातत्‍य आवश्‍यक ....... श्रीमती आश्विनी स्वामी

मौजे सायाळा येथे रासेयोचे विशेष शिबिर संपन्‍न 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या सुवर्ण जयंती महोत्सवाचे औचित्य साधुन विद्यापीठांतर्गत असलेल्या कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, अन्नतंत्र महाविद्यालय व उद्यानविद्या महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेच्‍या वतीने विशेष श्रमसंस्कार शिबीराचे मौजे सायाळा येथे दिनांक दिनांक ३ एप्रिल रोजी संपन्न झाले. शिबिराच्या समारोप कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी सहयोगी अधिष्ठाता डॉ. उदय खोडके हे होते तर कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्‍हणुन उपविभागीय प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती आश्विनी स्वामी उपस्थित होत्या.

मार्गदर्शनात श्रीमती आश्विनी स्‍वामी म्‍हणाल्‍या की, विद्यार्थ्‍यांनी स्पर्धापरिक्षेत यश प्राप्‍त करण्‍यासाठी अभ्यासात सातत्य ठेवण अत्‍यंत आवश्‍यक आहे. विद्यार्थ्‍यांना भेडसवण्‍या-या विविध समस्यांचा सर्वांगीण विचार करणे गरजेचे आहे.  महात्‍मा गांधी, संत गाडगेबाबा, लाल बहाद्दूर शास्त्री, ज्योतीराव फुले आदी समाजसुधारकांच्या जयंत्या साज-या करण्यासोबतच त्‍यांचे विचार सर्वांनी आचरणात आणन्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला. 

अध्‍यक्षीय भाषणात डॉ उदय खोडके म्‍हणाले की, रासेयोमुळे महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्‍यांना सामाजिक जबाबदारीची जाण निर्माण होते, विद्यार्थ्‍यांनी स्‍वयंसेवक म्‍हणुन स्‍वच्‍छता, वृक्षलागवड, अंध्‍दश्रध्‍दा निर्मुलण  आदी सामाजिक कार्यात सहभाग घ्‍यावा.  

शिबिरात स्वयंसेवकांनी सायाळा गावात स्‍वच्‍छता जनजागृती, कुपोषण निवारण, वृक्षलागवड आदी विविध उपक्रम राबविण्‍यात आले. आदींनी सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वितेकरिता कार्यक्रम अधिकारी डॉ. रवींद्र शिंदे, डॉ. प्रवीण घाटगे, डॉ. संतोष बरकुले, प्रा. संजय पवार, डॉ. सुरेंद्र सदावर्ते आदींसह रासेयो स्वयंसेवक निवृत्ती साबळे, प्रकाश पतंगे, संदेश चंद्रवंशी, आर्यन खंडागळे, आकाश शेगोकार, सारंग गायकवाड, रणजीत पाटील, अपेक्षा गागरे, प्रगती डुकरे, वैष्णवी शिसोदे, स्नेहल रेंगडे, श्रुती राजपूत, विशाल देशमाने, विक्रम पाटील, गौरी ठाकूर, प्रीती वाघमारे, तेजस्विनी चवरे, किरण कांबळे, ऋतुजा पाटील, शुभम इंगळे, झाशी कदम, शामल गुट्टे, अभय शिंदे, गोविंद खुळे, गोपाळ राऊत, मोनिका माजी, स्नेहल बडाख, मनोज दीक्षित, वरद कदम, श्रुती शडमाके, गावकरी माऊली खटींग, माणिक खटींग, भगवानराव खटींग यांनी परिश्रम घेतले.