कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयत आयोजित प्रशिक्षणाच्या समारोप
कृषी प्रक्रिया उद्योगाद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती शक्य असून कृषी प्रक्रिया उद्योगाच्या विकासासाठी मुल्य साखळी विकसित करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाच्या वतीने आयोजित दिनांक २८ ते ३० मार्च दरम्यान “कृषी प्रक्रीयेद्वारे उद्योजगता विकास” या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणुन संचालक शिक्षण डॉ. धर्मराज गोखले, नियंत्रक श्रीमती दीपाराणी देवतराज, महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. उदय खोडके, प्रशिक्षणाच्या आयोजक कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाच्या प्रमुख डॉ स्मिता खोडके आदीची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा डॉ अशोक ढवण पुढे म्हणाले की, भारतात व राज्यात कृषी प्रक्रिया उद्योगास मोठा वाव असून कृषी प्रक्रिया उद्योग सुरुवातीस लघुस्तरावर सुरु करून नंतर विपणन व्यवस्थेचे जाळे तयार करून त्याला मोठे स्वरूप देणे शक्य आहे. मराठवाड्यातील अनेक यशस्वी प्रक्रिया उद्योजक हे विद्यापीठाचे पदवीधर किंवा विद्यापीठातून प्रशिक्षण घेऊन गेलेले प्रशिक्षणार्थी आहेत असेही त्यांनी नमूद केले.
मार्गदर्शनात डॉ धर्मराज गोखले यांनी कृषी प्रक्रिया उद्योगामध्ये वेष्ठणीकरण, विक्री व्यवस्थापण यांचे खूप महत्व असल्याचे विविध उदाहरणे देऊन स्पष्ट केले. तर श्रीमती दिपाराणी देवतराज यांनी प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणात प्राप्त ज्ञानाचा उपयोग करून कृषि उद्योजक व्हावे हि अपेक्षा व्यक्त केली.
डॉ उदय खोडके यांनी महाविद्यालया मार्फत आयोजित केल्या जाणारे विविध प्रशिक्षण व उपक्रमाबाबत माहिती देऊन प्रधानमंत्री सूक्ष्म प्रक्रिया उद्योग उन्नयन योजना आणि मुख्यमंत्री कृषी प्रक्रिया योजना यांच्या माध्यमातून देशातील प्रक्रिया उद्योगासाठी जागरूकता निर्माण करणे, मनुष्यबळ विकसित करणे आणि असंघटीत असलेल्या लघु प्रक्रिया उद्योगांना एकत्रित करून त्यांना बळ देण्याचे काम मागील काही वर्षांपासून सातत्याने सुरु असल्याचे सांगितले.
कार्यक्रमात प्रशिक्षणार्थींनीही आपले मनोगत व्यक्त केले, तर मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. प्रास्ताविकात डॉ स्मिता खोडके यांनी प्रशिक्षण आयोजन करण्यामागील भूमिका विषद केली. सुत्रसंचालन शलाका कळमनुरीकर यांनी तर आभार प्रा. प्रमोदिनी मोरे यांनी मानले.
सदरिल प्रशिक्षण कार्यक्रमाचे भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांचे
अर्थसहाय्याने अनुसूचित जाती या प्रवर्गातील व्यक्तींसाठी आयोजन करण्यात आले होते.
प्रशिक्षणात मराठवाड्यासह राज्यातील विविध विभागातून प्रशिक्षणार्थी सहभागी झाले
होते. तांत्रिक मार्गदर्शनासोबतच वित्तपुरवठा, प्रकल्प अहवाल तयार
करणे, जिल्हा उद्योग केंद्र तर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध शासकीय
योजना, प्रक्रिया उद्योगाची उभारणी आदी विषयावर या प्रशिक्षणात मार्गदर्शन करण्यात
तसेच यशस्वी कृषी प्रक्रिया उद्योजक यांनी त्यांचे अनुभव सांगितले. कार्यक्रमास
विद्यापीठातील अधिकारी, विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित
होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. श्याम गरुड, शंकर शिवणकर, हेमंत रुपनवर, निल्झा ओझेस, शलाका कलमनुरीकर, तेस्वीविनी कुमावत, सीमा आखाडे, पल्लवी वैद्य, रचना जाधव, आदित्य खिस्ते, माउली खातिंग, रीन्केश जाधव आदींनी
परिश्रम घेतले.