Friday, April 1, 2022

वनामकृवित शेळीपालन प्रशिक्षण कार्यक्रम संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या परभणी कृषि महाविद्यालयातील पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाच्‍या वतीने भारतीय अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्याकडून मानव विकास अनुसूचित जाती उपयोजनेच्‍या प्राप्‍त निधीतुन दिनांक 29 ते 31 मार्च दरम्‍यान तीन दिवसीय शेळीपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदरिल प्रशिक्षणाचा समारोपीय कार्यक्रम दिनांक ३१ मार्च रोजी शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले याच्‍या अध्‍यक्षतेखाली संपन्‍न झाला. कार्यक्रमास प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, डॉ. दिनेशसिंह चौहान, डॉ. रवीद्र देशमुख, डॉ. शंकर नरवाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्‍यक्षीय भाषणात डॉ. धर्मराज गोखले म्‍हणाले की, शेतीपुरक जोडधंदा म्‍हणुन शेळीपालन हा किफायतीशीर व्‍यवसाय असुन शेतकरी गटाच्‍या माध्‍यमातुन हा व्‍यवसाय अधिक किफायतीशीर होऊ शकतो.

मार्गदर्शनात डॉ. सय्यद इस्माईल यांनी शेळीपालन प्रशिक्षण हे रोजगार निर्मीती साठी सहाय्यक ठरावे अशी अपेक्षा व्यक्त केली. तर डॉ. दिनेशसिंह चौहान यांनी शेतीपालन व्यवसाय जीवनमान उंचावण्यासाठी फार मोलाचे ठरेल, असे म्‍हणाले. तसेच डॉ. रविंद्र देशमुख, यांनी सामुहीक शेळीपालनाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमात डॉ. शंकर नरवाडे मनोगत व्यक्त केले तसेच प्रशिक्षर्णार्थी पवार, तुपसुंदर, सुंगधे, विजयकुमार भालेराव आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रशिक्षणात ३६ प्रशिक्षाणार्थी उपस्थित होते. मान्यवरांचे हस्ते प्रमाणपत्राचे व कृषि दैनंदिन यांचे वाटप करण्यात आले.

डॉ. रमेश पाटील यांनी प्रास्‍ताविक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. दत्ता बैनवाड यांनी केले तर आभार डॉ. नरेंद्र कांबळे मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. बाळासाहेब अंधारे, डॉ. संदेश देशमुख, श्री. फारुख शेख, श्री. जाधव, श्री. रणेर आदीसह पदव्युत्तर व आचार्य पदवीच्या विद्यार्थ्यांनी, विभागातील सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.