Tuesday, April 12, 2022

वनामकृवितील परभणी कृषि महाविद्यालयात सलग अठरा तास अभ्‍यास उपक्रमाचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्‍मा ज्‍योतिबा फुले यांच्‍या संयुक्‍त जयंती निमित्‍त दिनांक 12 एप्रिल रोजी सलग अठरा तास अभ्‍यास उपक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. या उपक्रमाचे उदघाटन शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले यांच्‍या हस्‍ते  करण्‍यात आले. यावेळी प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, प्राचार्य डॉ जी एम वाघमारे, प्राचार्य डॉ बी व्‍ही आसेवार, सहयोगी अधिष्‍ठाता निम्‍नस्‍तर डॉ गजेंद्र लोंढे, विभाग प्रमुख डॉ संजीव बंटेवाड, डॉ प्रविण वैद्य, डॉ डॉ डी एस पेरके, डॉ आर पी कदम, डॉ एच व्‍ही काळपांडे, डॉ आर जी भाग्‍यवंत, विद्यापीठ ग्रंथपाल डॉ संतोष कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती. सुत्रसंचालन डॉ रामप्रसाद खंदारे यांनी केले. महाविद्यालयाच्‍या मुलींच्‍या वसतीगृहातही विद्यार्थ्‍यीनीनी सदर उपक्रम राबविला उपक्रमात कृषि महाविद्यालयाच्‍या तीनशे पेक्षा जास्‍त विद्यार्थी विद्यार्थींनीनी सहभाग नोंदविला. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी कृषि महाविद्यालयातील प्राध्‍यापक व कर्मचा-यांसह विद्यार्थ्‍यांनी परिश्रम घेतले.