वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्तार शिक्षण संचालनालय अंतर्गत असलेले कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र आणि नांदेड येथील वनश्री सामाजिक, सांस्कृतीक व ग्रामीण विकास संस्था यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक ८ ते १० जुन दरम्यान शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकरिता प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. सदरिल प्रशिक्षणाचा समारोपीय कार्यक्रम दिनांक १० जुन संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य कृषिविद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे हे होते तर वनश्री संस्थेचे अध्यक्ष श्री. रमेश राठोड, चार्टेड अकाऊंटंट श्री. मितेश मालीवाल, डॉ.मधुमती कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात डॉ. गडदे म्हणाले की, शेतकरी उत्पादक कंपन्याच्या माध्यमातुन शेतकरी एकत्र येत असुन एकत्रित कृषि मालाची विक्री केल्यास शेतमाल विक्रीतुन अधिक नफा मिळण्यास मदत होत आहे. शेतक-यांच्या शेतीशी निगडीत समस्याचे निराकरण करण्यासाठी विद्यापीठ सदैव तत्पर असल्याचे ते म्हणाले. तसेच वनश्री संस्थेच्या संचालिका श्रीमती नीता माळी यांनी विद्यापीठाच्या प्रशिक्षणातील मार्गदर्शनामुळे अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती मिळाल्याचे मत मनोगतात व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व श्री.मधुकर मांडगे यांनी केले तर आभार श्री. दिपरत्न सूर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्ञानोबा माहोरे, दिगंबर रेंगे, नितीन मोहिते, शेख साजेद, शेख सुलताना शेख पाशा आदींनी विशेष परिश्रम घेतले.
शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना शेतीशी निगडीत आधुनिक तंत्रज्ञान अवगत करून देणे व कंपनी सदस्य शेतक-यांचे ज्ञान वृद्धींगत करून त्यांचे उत्पन्न वाढविणे हा उद्देश ठेवुन सदरिल प्रशिक्षणाचे आयोजन विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
प्रशिक्षणात
आधुनिक तंत्रज्ञानाने सोयाबीन, कापुस
व हळद लागवड, विक्री आणि प्रक्रिया, दुग्धजन्य
पदार्थ निर्मीती, शेळीपालन, शेतीमधील
संधी, आव्हाने व समस्या, मुल्यसाखळी
विश्लेषण आणि विपणन, कृषि प्रणाली मध्ये स्टोरेज, पॅकेजींग, ब्रँण्डींग व लेबलींग आदी विषयांवर
विद्यापीठातील तज्ञांनी मार्गदर्शन केले.