वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या परभणी कृषि महाविद्यालयतील ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम (रावे) अंतर्गत करडई संशोधन केंद्र येथील कार्यरत असलेल्या कृषीकन्यानी दिनांक २८ जुन रोजी मौजे जांब येथे पशुंना घटसर्प व फऱ्या रोगप्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवुन १९० पशूंना लसीकरण करण्यात आले.
मोहिमेत पशुधन विकास अधिकारी डॉ. आडे आणि डॉ. यु. आर. लकरे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास सरपंच रामभाऊ रेंगे, माजी सरपंच अजयराव
जामकर,
पशुधन विकास अधिकारी डॉ. आडे आणि डॉ. लकरे, ग्रामसेवक पंजाबराव देशमुख, बाळासाहेब रेंगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात डॉ. आडे आणि डॉ. लकरे यांनी पशु लसीकरणाचे महत्व सांगितले, त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील १९० पशुंचे लसीकरण
करण्यात आले. याप्रसंगी पशुपालकांना
भिंतीफलकांवर व तक्ताद्वारे जनावरांच्या रोगांविषयी माहिती देण्यात आली.
सदरिल कार्यक्रम शिक्षण संचालक डॉ. डी. एन. गोखले, प्राचार्य डॉ. सय्यद
इस्माईल, रावे समन्वयक डॉ. आर.
पी. कदम,
करडई संशोधन केंद्राचे डॉ. एस. बी. घुगे, रावे सहसमन्वयक डॉ . पी. एस. कापसे, कार्यक्रम अधिकारी डॉ. ए. डब्ल्यू. मोरे आदींच्या मार्गदर्शनाखाली आयोजित
केला होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. ए. डब्ल्यू. मोरे यांनी केल. सूत्रसंचालन प्राजक्ता गवळी हिने केले तर आभार श्रुती देशमुख हिने मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषीकन्या वैष्णवी देशमुख, गायत्री धानोरकर, प्रीती गरड, मेघा गिरी, अंजू हेंद्रे, रेणुका गादेवार, वेदिका धुतराज, मनस्वी भोयर, स्नेहल चव्हाण, प्रियंका ढगे, अखिला, पूजा चंदा, अमृता देशमुख, प्रणिता भोसले, प्रियंका चौरे, ऐश्वर्या आंबेकर आदींनी परिश्रम घेतले.