Wednesday, June 29, 2022

मौजे कोल्हावाडी येथे कृषिकन्यांनी राबविला बीजप्रक्रिया प्रात्‍यक्षिक कार्यक्रम

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत मौजे कोल्‍हावाडी येथे दिनांक २७ जुन रोजी कृषिकन्यांनी सोयाबीन बीज प्रक्रियेचे प्रात्‍यक्षिक दाखविण्‍यात आले. बीज प्रक्रिया करण्‍याची शास्‍त्रशुध्‍द पध्‍दती व त्याचे फायदे तसेच पिकांच्या व मातीच्या आरोग्यासाठी जैविक बीजप्रक्रियेचे महत्त्व यावर माहिती दिली. याप्रसंगी बुरशीनाशक - ट्रायकोडर्मा तसेच जीवाणु संवर्धक रायझोबियम यांची बीजप्रक्रिया कृषिकन्या ज्योती लगड व मयुरी इंगळे यांनी सोयाबीन बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखवले. कृषिकन्या काळे, कुलकर्णी, कऱ्हाळे, जैस्वानी, खैरे, कदम, कणखर आदींनी सहकार्य केले. सदरिल उपक्रम प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, रावे समन्वयक डॉ. राजेश कदम, रावे केंद्रप्रमुख डॉ. चंद्रकांत लटपटे, सहसमन्‍वयक डॉ प्रविण कापसे, कार्यक्रम अधिकारी डॉ. अनंत लाड आदींच्‍या मार्गदर्शनाखाली राबविण्‍यात येते आहे. कार्यक्रमास माजी सरपंच श्री.विठ्ठल भिसे यांच्‍यासह गावांतील शेतकरी उपस्थित होते.