मासिक चर्चासत्रांतर्गत शेतक-यांच्या शेतावर भेट व मार्गदर्शन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र आणि कृषि
विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २४ जुन रोजी जिल्हा मासिक चर्चासत्रा
अंतर्गत परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यामधील मौजे पोहेटाकळी, जैतापुरवाडी, खेर्डा, वडी आणि बोरगव्हाण या ठिकाणी शेतक-यांच्या
शेतावर प्रत्यक्ष भेटी देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमास हिंगोली मतदार संघाचे आमदार मा. श्री. तानाजीराव मुटकुळे, विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ
गजानन गडदे, कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत, डॉ. काकडे, कृषि उपसंचालक श्री. बी. एस. कच्छवे,
तालुका कृषि अधिकारी श्री. वी. टी. शिंदे, श्री.
प्रभाकर बनसावडे, श्री.काळे, श्री.भिसे
आदींची प्रमुख उपस्थिती होती.
बीबीएफ तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करतांना डॉ. गजानन गडदे म्हणाले की, बीबीएफ पद्धतीने सोयाबीनची पेरणी
केल्यास जास्त पाऊस पडल्यास बीबीएफच्या सऱ्याद्वारे हे पाणी वाहून जाते तर कमी
पाऊस पडल्यास ते सऱ्यामध्ये जागच्या जागी मुरते, आणि पावसाचा
खंड पडल्यास हेच पाणी पिकांना उपलब्ध होते. तसेच पिकामध्ये हवा खेळती राहत
असल्यामुळे पारंपारीक पद्धतीपेक्षा २० टक्के अधिकचे उत्पादन मिळते.
सूत्रसंचालन मंडळ कृषी अधिकारी श्री भिसे यांनी केले तर आभार कृषी पर्यवेक्षक श्री ढगे यांनी मानले. कार्यक्रमास कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.