वनामकृवितील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात माझी वसुंधरा अभियान संपन्न
प्रत्येक देशाच्या भवितव्यासाठी पाणी, ऊर्जा, स्वास्थ्य, कृषी, जैवविविधता आदीबाबत प्रत्येक नागरिकांनी सजग
राहणे नितांत गरजेचे असुन पर्यावरणाचे संरक्षण होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या
वर्तनात उचित बदल होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जलमित्र इंजि. शंकर आजेगावकर
यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात माझी वसुंधरा अभियानांतर्गत ‘पर्यावरण जनजागृती व स्वच्छता सप्ताहानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले, या अभियानाच्या समारोपाप्रसंगी दिनांक १३ जुन रोजी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहयोगी अधिष्ठाता डॉ जया बंगाळे या होत्या तर कार्यक्रमास जलमित्र प्रतिष्ठान परभणीचे संस्थापक डॉ. राजगोपाल कालानी, जलमित्र डॉ. रवींद्र मुळे, श्री. रुस्तुम कदम, श्री. उमेश पाचलींग आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात जलमित्र डॉ. राजगोपाल कालानी, जलमित्र डॉ. रवींद्र मुळे, श्री. रुस्तुम कदम, श्री. उमेश पाचलींग याच्या पर्यावरण संरक्षणासाठी असलेल्या बहुमोल योगदानाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ विद्यानंद मनवर यांनी केले, आभार डॉ निता गायकवाड यांनी मानले. शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले व सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. जया बंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, झाडांना आच्छादन, पालापाचोळयापासून गांडूळ खत निर्मिती, पर्यावरण संरक्षणाबाबत मान्यवरांचे मार्गदर्शन, जनजागृती प्रभात फेरी, ‘आम्ही पर्यावरण रक्षक’ पथनाट्य आदीं विविध उपक्रम महाविद्यालयाच्या रासेयोच्या कार्यक्रम अधिकारी डॉ विद्यानंद मनवर यांच्यासह स्वयंसेवकांनी विविध राबविले. कार्यक्रमास डॉ. शंकर पुरी, डॉ. सुनिता काळे, डॉ. तस्नीम नाहिद खान, डॉ. माधुरी कुलकर्णी आदीसह प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.