Saturday, June 18, 2022

वनामकृवि विकसित ज्‍वार वाणाच्‍या बियाण्‍याचे आद्यरेषिय पिक प्रात्यक्षिक योजनेअंतर्गत वाटप

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत ज्वार सुधार प्रकल्पाच्‍या  आद्यरेषिय पिक प्रात्यक्षिक योजनेअंतर्गत दिनांक १६ जुन परभणी तालुक्यातील मौजे जांब, सनपुरी, रायपुर आदी गावांतील निवडक शेतक-यांना खरीप ज्वारीचे बियाणे, बीजप्रक्रियेकरिता गाऊचु व ट्रायकोबुस्टचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्वार संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी तथा वरिष्ठ ज्वार पैदासकार डॉ. के. आर. कांबळे तर ज्वार पैदासकार डॉ. एल. जावळे, ज्वार किटकशास्ञज्ञ डॉ. मोहम्मद ईलियास, ज्वार कृषिविद्यावेत्ता डॉ. प्रितम भुतडा आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात डॉ. के. आर. कांबळे यांनी ज्वारी पिकाचे मानवी आहारातील महत्व व दुध व्यवसायात जनावरांकरिता कडब्याचे महत्व सांगितले. डॉ. एल. एन. जावळे यांनी विद्यापीठ विकसित ज्‍वारीचे वाण परभणी शक्ती व सीएसएच ४१ बाबत माहिती देऊन ज्‍वारी लागवड तंञज्ञानाबाबत मार्गदर्शन केले तर डॉ. मोहम्मद ईलियास यांनी खोडमाशी, खोडकिड, अमेरिकन लष्करी अळी, हुमनी, मावा दी किडीच्या व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन करून बीजप्रक्रिया करणे गरजेचे असल्‍याचे सांगितले. तसेच डॉ. प्रितम भुतडा यांनी आद्यरेषिय पिक प्रात्यक्षिक योजने बद्दल माहिती देऊन जिओ टॅगिग करण्‍याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुञसंचालन डॉ. प्रितम भुतडा यांनी केले. सदरिल कार्यक्रम संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनानुसार घेण्‍यात आला. कार्यक्रमास जांब, सनपुरी, रायपुर आदी गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते.